मुंबई : 'भारतरत्न' सचिन तेंडुलकर याच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंना घडवणारे क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर आज अत्यंत शोकाकुल वातावरणात शिवाजी पार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी आचरेकर सरांचे अंत्यदर्शन घेतले. खेळाबरोबरच जगायला शिकवणाऱ्या लाडक्या सरांना निरोप देताना सचिनला अश्रू अनावर झाले होते.
आचरेकर सरांनी ज्या शिवाजी पार्क मैदानातील खेळपट्टीवर क्रिकेटपटू घडवले, त्याच ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी शिवाजी पार्क मैदानात सराव करणाऱ्या लहान क्रिकेटपटूंनी बॅट उंचावत त्यांना अखेरचं अभिवादन केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सरांची अंत्ययात्रा निघाली. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित या शिष्योत्तमांनी सरांच्या पार्थिवाला खांदा दिला. हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते. दुपारी बारा वाजता आचरेकरांच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आला.
रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म १९३२ साली मालवण इथं झाला. त्यांनी १९४३ सालापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, पण प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. २०१० मध्ये केंद्र सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. क्रिकेट प्रशिक्षणातील उल्लेखनीय योगदानासाठी १९९० साली त्यांना मानाच्या द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरव करण्यात आलं होतं. दादरला शिवाजी पार्क येथे त्यांनी कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली. क्रिकेट प्रशिक्षक म्हणून आचरेकर सरांनी सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित, बलविंदर सिंग संधू, समीर दिघे यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू घडवले.
''माझ्या आयुष्यातील त्यांचं योगदान शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आज मी ज्या ठिकाणी आहे, त्याचा पाया सरांनी रचला', असं सागून सचिननं त्यांच्यासोबतच्या अखेरच्या भेटीतील आठवणींनाही ट्विटरवर उजाळा दिला आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |