सातारा : सातारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांची आज १३ सदस्यीय समितीने साधारण ५ तास चौकशी केली. त्याचा अहवाल नगर विकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट २०१६ रोजी मुख्याधिकारी म्हणून शंकर गोरे सातारा नगर पालिकेत हजर झाले. अडीच वर्षोत त्यांचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले. चिमणपुऱ्यातील बेकायदेशीर बांधकाम, अशोक मोने यांना अपात्र ठरविण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष, चुकीच्या सेवा निवृत्तीची बिले काढणे, साशा कंपनीच्या बिलामध्ये अनियमितता तक्रारींकडे कानाडोळा करणे, सदरबझार येथील ५२३ मिळकत बेकायदेशीर हस्ततरण, शासनाच्या महसूलाचे नुकसान करणे, १६ जमिनीचे वाटप अनिधिकृतपणे करणे यासह मुख्याधिकारी पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात लोकशाही दिनात लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. अडीच वर्षोत २१ लोकशाही दिन झाले मात्र एकदाही ते उपस्थित न राहिल्याने त्यांच्या विरोधात नगर विकास विभागाकडे गेलेल्या होत्या.
याबाबत नगर विकास विभागाने सातारा जिल्हा धिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हा धिकाऱ्यानी प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांना गोरे यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लेखाधिकारी, वरिष्ठ लिपिक यांचा समावेश असलेल्या १३ जणांच्या समितीने पालिकेत दुपारी १ ते ६ अशी सलग सहा तास चौकशी केली. त्याचा अहवाल नगर विकास विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |