04:16pm | Aug 16, 2018 |
सातारा : काल संपूर्ण भारत देशात आणि जगभरात भारताचा 72 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या धडाक्यात साजरा झाला. स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच भारतीयांना भारतीय असल्याचा साक्षात्कार होत असतो. इतरवेळी ते स्वत:च्या जातीपातीतच अडकलेले असतात. जाती पलिकडेही देश नावाचा धर्म आहे, याचे अनेकांना आकलन होत नाही. असाच एक प्रसंग कोरेगाव, जि. सातारा येथे घडला.
कोरेगावमध्ये असलेल्या रेल्वे स्टेशनवर रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व रिक्षा चालकांनी झेंडा वंदनाचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमाला उणीपुरी दहा ते बारा लोकच होते. हा झेंडा वंदनाचा कार्यक्रम सुरु असतानाच अनिल घाडगे हे व त्यांचा भाचा कोरेगावातील कार्यालयाचा ध्वजवंदनाचा कार्यक्रम आटोपून कराडकडे निघाले होते. त्याचवेळी त्यांच्यासमोर अद्भूत असे चित्र समोर उभे राहिले. साधारणत: चाळीशी पार केलेला, कळकटलेले कपडे, पिंजारलेले केस, काखेत तशीच कळकटलेली बॅग, साधारणत: भिकारी किंवा वेडा असा वेश असलेला माणूस पायातील पादत्राणे काढतो आणि फडकत असलेल्या तिरंग्याला अभिमानाने सलाम करतो. बस्स... असे चित्र दुर्मिळच परंतू अनिल घाडगे यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता आपल्या खिशातील स्मार्टफोनने हा दुर्मिळ योगायोग टिपला आणि हा फोटो सोशल मिडियावर टाकला. काही तासांतच हा फोटो देशभरात फिरला. भन्नाट टायमिंगमुळे या फोटोने माणसाला जगण्याची कला शिकवली.
अनिल घाडगे हे कोरेगाव पंचायत समितीत पशुसंवर्धन विभागात कार्यरत आहेत. कुठलाही फोटोग्राफीचा छंद नाही, अथवा गंधही नाही. स्वातंत्र्यदिनाचा कार्यालयातील कार्यक्रम संपवून ते कोपर्डे शिरवडे, ता. कराड या गावी जायला निघाले होते. परंतू ट्रेन उशीरा येणार असल्याने ते रेल्वे स्टेशनसमोर थांबले होते. क्षणार्धात त्यांच्यासमोर हा कळकटलेला, मळकटलेला अवलिया येवून थांबला. समोर झेंडावंदनाचा कार्यक्रम. क्षणभरात पायातील पायताणे काढून त्याने तिरंग्याला खणखणीत सलाम केला. अवघ्या चार-पाच सेकंदातील हा क्षण अनिल घाडगेंनी आपल्या फोनमध्ये कैद केला. शतकातला दर्जेदार फोटो म्हणून देशभरातून अनिल घाडगेंच्या या फोटोला सोशल मिडियावर प्रतिक्रिया उमटल्या. अनेक बहाद्दरांनी हा स्वत:च काढलेला फोटो म्हणून सोशल मिडियावर व्हायरल केला. परंतू सत्य लपत नाही. फोटो लोकेटर नावाच्या ऍप्लीकेशनमुळे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झाले आहे. काल संध्याकाळपासून अनिल घाडगेंना देशभरातून फोन आले आहेत. तसेच केरळमधील एका संस्थेने ‘त्या’ शहाण्या (याला वेडा कसे म्हणावे?) माणसाबद्दल विचारणा केली. त्याच्यावर विनाशुल्क उपचाराची जबाबदारी घेतली. मात्र अनिल घाडगे यांनी रेल्वे प्रशासनाला व पोलिसांना विचारले असता त्यांनी या माणसाबद्दल काहीच माहित नाही. तसेच या माणसाला यापूर्वी याठिकाणी कधीच पाहिले नसल्याची माहिती दिली. कोरेगावमधील काही चिकित्सक युवक या माणसाचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.
काल देशभरात स्वातंत्र्यदिन धडाक्यात साजरा झाला. देशाच्या राष्ट्रपती भवन, लाल किल्ल्यापासून झोपडीवरही तिरंगा फडकला. अनेकांनी उंची कपडे व पादत्राणे घालून देशाचा राष्ट्रध्वज फडकवला. परंतू सत्तेच्या मस्तीत मदमस्त झालेल्यांना राष्ट्रध्वज फडकवताना पादत्राणे काढण्याचेही भान राहिले नाही. शिष्टाचार काय असतो, तो काल कोरेगाव रेल्वेस्टेशनवर ‘त्या’ शहाण्याने संपूर्ण भारताला शिकवला. ‘यह आजादी झुठी है, देश की जनता 72 साल बाद भी भुखी हैं’ हे या व्हायरल फोटोच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गरीबीला प्रगल्भतेचे कोंदण मिळाल्यास माणूस गरीब राहत नाही. कपड्याने व कृतीने कोणी गरीब ठरत नाही. विचार प्रगल्भ, तोच माणूस मोठा, हे ‘त्या’ शहाण्याने कृतीतून दाखवून दिले आहे. नाहीतर मंगेश पाडगावकरांची एक विद्रोही कविता आहेच... ‘सलाम प्यारे भाईयों और बहनों, सबको सलाम. डावा हात xxx सबको सलाम’ ही व्यवस्था आणि लोकांच्या मानसिकतेवर परखड भाष्य करणारी कविता याठिकाणी चपखल लागू होते. अनिल घाडगे यांनी काढलेला फोटो कदाचित शतकातील सर्वोत्कृष्ट फोटो ठरेलही. मात्र ज्या शहाण्याने पादत्राणे काढून राष्ट्रध्वजाबद्दल शिष्टाचार दाखवला, त्या शहाण्यालाही खर्या अर्थाने सलाम!
मी काढलेला फोटो एवढा व्हायरल होईल याची कल्पनाही केली नव्हती
काल मी कोरेगाव रेल्वेस्टेशनवर काढलेला फोटो जगभरात एवढा व्हायरल होईल, याची साधी कल्पनाही केली नव्हती. फोटो काढल्यानंतर सहज तो मनाला भावला व सर्व व्हॉटसऍप ग्रुपवर पोस्ट केला. क्षणात तो देशासह जगभरात पसरला. त्यामुळे मला जगभरातून फोन आले आहेत. या फोटोतील माणसाबद्दल अनेकांनी विचारणाही केली आहे. तसेच केरळमधील एका संस्थेने त्या माणसावर विनाशुल्क उपचार करण्याची जबाबदारीही स्विकारण्याची तयारी दर्शवली आहे. मी फोटोग्राफर नाही, किंवा त्यातील ज्ञानही नाही. परंतू समोर घडत असलेली घटना मी काल माझ्या फोनच्या कॅमेर्याने टिपली व ती सोशल मिडियावर पोस्ट केली. सोशल मिडियावर नकारात्मक सह सकारात्मक गोष्टींची दखल घेतली जाते, याचा अनुभव मला यानिमित्ताने आलेला आहे, असे अनिल घाडगे यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना सांगितले आहे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |