खंडाळा : आशियाई महामार्गावर खंबाटकी घाटातील बेंगरुटवाडी ता . खंडाळा गावच्या हद्दीत एस कॉर्नरवर साखर घेऊन जाणारा ट्रक व ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला यामध्ये साखरेच्या ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर ट्रक पलटी झाल्यानंतर या अपघातात ट्रँकटरमधील अशोक शामराव जाधव (वय ४५ रा. बोपेगांव ता. वाई ) हे ठार झाले आहेत .
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली व खंडाळा पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अथनी ( कर्नाटक ) येथून साखरेची पोती घेऊन मालट्रक क्र .MH -15 - EG - 9612 हा पुण्याच्या दिशेने निघाला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास खांबाटकी बोगदा ओलांडून पुण्याकडे जाताना एस कॉर्नरवर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रकने पुढे चाललेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली व पलटी झाला. सुमारे शंभर फूट ट्रॅक्टर ट्रकने पुढे रेटत नेला. रस्त्याच्या कडेला असलेला संरक्षक कठडा व ट्रक च्या मध्ये ट्रॅक्टरचा चक्काचूर झाला. तर ट्रकमधील साखरेची पोती रस्त्यावर विखूरली गेली. या अपघातात ट्रॅक्टरमधील अशोक जाधव वय 45 रा. बोपेगांव हे उपचारादरम्यान ठार झाले तर सहकारी बाळासाहेब गोविंद जाधव वय 54 रा. पांडे , ट्रकमधील अमोल काशीनाथ वाघ वय 26 , संदीप वीर भोसे वय 27 हे तिघे जखमी झाले आहे. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड करीत आहेत.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |