05:14pm | Dec 16, 2018 |
सातारा : महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे ‘दमदार’ पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या अकाली बदलीने महाबळेश्वरकर हळहळले असून नाळे यांची नुकतीच फलटण शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी नियुक्ती झाली आहे. मात्र, पोलीस निरीक्षक नाळेंच्या बदलीमुळे महाबळेश्वरमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे हे 2014 साली सातारा जिल्हा पोलीस दलात बदली होवून आले होते. सुमारे एक वर्ष त्यांनी सातारा येथील जिल्हा विशेष शाखेचा कार्यभार सांभाळला होता. नाळे यांच्या कामाच्या पद्धतीने प्रभावित होवून तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांची सातारा तालुका पोलीस ठाण्यात बदली केली होती. सुमारे अडीच वर्षे नाळे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्याचा कार्यभार अतिशय सक्षमपणे सांभाळला होता. नाळे यांच्या कार्यकाळात मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चिंचणेर वंदन, ता. सातारा येथे जातीय दंगल उसळली होती. पोलीस निरीक्षक नाळे यांनी ही पेटलेली दंगल सुयोग्यरित्या हाताळत त्याचे लोण तालुक्यात व जिल्ह्यात पसरु नये याची दक्षता घेतली होती.
तत्कालीन पोलीस प्रमुख संदीप पाटील व राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनीही पो. नि. नाळे यांच्या कामगिरीचे कौतुक केले होते. सुमारे दीड वर्षापूर्वी झालेल्या जिल्हाअंतर्गत बदल्यांमध्ये नाळे यांना महाबळेश्वर पोलीस ठाण्याचा चार्ज देण्यात आला होता. महाबळेश्वर हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ आहे. देशभरातून लाखो पर्यटक या हिलस्टेशनला भेट देत असतात. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असते. याची दखल घेवून नाळे यांनी महाबळेश्वरमधून अडव्यातिडव्या जाणार्या ट्रॅफिकची घडी बसवली होती. गेल्या अनेक वर्षामध्ये कोणत्याही पोलीस अधिकार्याला महाबळेश्वरमधील वाहतुकीची घडी बसविता आली नव्हती. ती कामगिरी नाळे यांनी करुन दाखवली होती. महाबळेश्वरमधील बेशिस्त घोडे, टॅक्सी चालकांवरही कायद्याचा वचक बसवून त्यांनाही सरळ करण्याचे काम नाळे यांनी केले आहे. महाबळेश्वरमध्ये जातीय दंगली यापूर्वी घडत असत. परंतू नाळे यांनी दोन्ही समाजामध्ये सुसंवाद घडवून आणला. त्यामुळे नाळे यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना महाबळेश्वरमध्ये घडली नाही.
महाबळेश्वरमध्ये हॉटेल व्यवसाय हंगामामध्ये तेजीत असतो. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये प्रचंड प्रमाणात स्पर्धाही वाढली आहे. शहरासह तालुक्यात अनेक मोठी हॉटेल्स व रिसॉर्ट्स आहेत. यापूर्वी ओळखपत्राशिवाय अनेक पर्यटकांना हॉटेलमध्ये रुम दिल्या जायच्या. परंतू हॉटेल चालकांच्या या ‘शॉर्टकट’वर बडगा उगारुन नाळे यांनी पर्यटकांना हॉटेलमधील रुम घ्यायची असेल तर ओळखपत्र सक्तीचे केल्यामुळे महाबळेश्वरमध्ये येणार्या अनेक वाईट प्रवृत्तींना चाप बसला. परिणामी महाबळेश्वरमधील क्राईमरेट वाढला नाही. दीड वर्षाच्या कार्यकाळात पो. नि. नाळे यांनी महाबळेश्वरमध्ये अनेक अभिनव उपक्रम राबविले. असे असताना दोन दिवसांपूर्वी नाळे यांची अचानक फलटण शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी नियुक्ती केल्यामुळे महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे. शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकार्याची अशी अकाली बदली का झाली असावी, असे प्रश्न महाबळेश्वरकरांच्या मनात येत आहेत. मात्र, याला उत्तर मात्र अद्याप मिळालेले नाही.
गेल्या महिन्यापासून फलटण शहर पोलीस ठाणे राज्यभरात चर्चिले जात आहे. फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यातील कारभार्यांच्या बदली, निलंबनामुळे जिल्हा पोलीस दलातील वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील नियुक्त केलेले अधिकारी अचानक ‘सिक’मध्ये गेल्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांना अधिकार्यांना पोलीस ठाणे नेमून देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. फलटण शहरसारख्या विस्फोटक पोलीस ठाण्यात पो. नि. नाळेंची बदली झाल्यामुळे फलटण शहर पोलीस ठाण्याची घडी नाळे बसवतीलच. मात्र त्याअगोदर फलटण पोलीस ठाण्यातील यापूर्वीच्या भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्यांनी केलेली ‘घाण’ पो. नि. नाळे यांना साफ करावी लागणार आहे. तरच पो. नि. नाळे फलटण शहर पोलीस ठाण्यात काम करु शकणार आहेत. 2014 पासून पो. नि. नाळे यांनी जिल्ह्यात अभिनव अशी कामगिरी केली आहे. गेल्या दीड वर्षात महाबळेश्वरची विस्कटलेली घडी नाळेंनी व्यवस्थित केली आहे. मात्र अशा कर्तव्यदक्ष अधिकार्याची महाबळेश्वरमधून बदली झाल्यामुळे महाबळेश्वरकर मात्र हळहळताहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |