11:56pm | Dec 16, 2018 |
सातारा : सालपे ता. फलटण येथे शांताबाई जयवंत खरात (वय 70) या वृध्द महिलेच्या खूनाला अखेर दीड महिन्यानंतर वाचा फुटली असून चोरीच्या उद्देशाने तो खून झाला असल्याचे समोर आला आहे. याप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या (एलसीबी) पथकाने रोहित उर्फ तक्या चिवळ्या पवार (वय 19, रा.वाळवा, सांगली सध्या रा.चौधरवाडी ता.फलटण) याला अटक केली असून त्याने खूनाची कबुली दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 29 ऑक्टोबर 2018 रोजी शांताबाई खरात या महिलेचा धारदार शस्त्राने खून झाला होता. पहाटे त्या लघुशंकेसाठी बाहेर आल्यानंतर खूनाची घटना घडली होती. कुटुंबियांना वृध्द शांता खरात रक्ताच्या थारोळ्यात दिसल्यानंतर या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्लेखोरांनी खरात यांच्या पाठीवर वार करुन गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरुन नेला होता. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तपासाला सुरुवात केली मात्र त्यात त्यांना सुरुवातीला यश आले नाही. यामुळे शांताबाई खरात यांचे मारेकरी कोण? ते कितीजण होते? कोणत्या कारणासाठी खून झाला? याबाबत गूढ निर्माण झाले होते.
दोन दिवसांपूर्वी सातारा एलसीबीचे पोनि विजय कुंभार यांना या घटनेबाबत माहिती मिळाली. सालपे येथील खूनप्रकरणी संशयित सांगली जिल्ह्यातील असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी सांगली पोलिसांशी संपर्क साधला. संशयित तक्या पवार याला सांगली पोलिसांनी ताब्यात घेवून सातारा एलसीबीला दिल्यानंतर त्याच्याकडे रविवारी चौकशीला सुरुवात केली. चौकशीमध्ये तक्या पवार याने बहुतेक गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर पोलिसही हादरुन गेले. संशयिताने सालपे घाटात चोरीच्या उद्देशाने फिरत असताना वृध्द महिलेचा खून केला असल्याची कबुली दिली. याशिवाय त्याच दिवशी मोर्वे ता.खंडाळा येथेही घरफोड्या केल्याची कबुली दिली. या कृत्यामध्ये त्याच्यासोबत आणखी चार साथीदार सोबत असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.
संशयित तक्या पवार याच्याकडे प्राथमिक चौकशी झाल्यानंतर सातारा एलसीबीने त्याला लोणंद पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, सपोनि गिरीष दिघावकर, पोलिस हवालदार घोरपडे, नवघणे, माने, मुलाणी, बेबले, गोगावले, फडतरे, कारंडे, काटकर, सावंत, जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |