04:03am | May 24, 2019 |
सातारा : महाराष्ट्रात बहुचर्चित अशा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादीची माढ्याची अभेद्य गढी काबिज करत राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचा तब्बल पाऊण लाखांच्या मताधिक्याने पराभव करीत राष्ट्रवादीची पारंपारिक गढी भेदण्यात यश मिळवले आहे.
राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतू पराभवाची जाणीव झाल्यानंतर पवारांनी माढ्यातून लढण्याचा निर्णय मागे घेतला. पवारांनी माघार घेतल्यानंतर माढा लोकसभेसाठी अनेक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. शेवटी भाजपच्या टेकूवर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेल्या संजयमामा शिंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली. राष्ट्रवादीचे दख्खनचे शिलेदार म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे ऐनवेळी भाजपात डेरेदाखल झाल्यामुळे निवडणुकी अगोदरच राष्ट्रवादीचे बुरुज ढासळले होते. माण-खटावमधूनही गोरे बंधूंनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेवून उघड-उघड भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही लढत तुल्यबळ होणार, अशी शक्यता वर्तविली जात होती. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही माढा मतदारसंघात सहकार मंत्री सुभाष देशमुख, ना. चंद्रकांतदादा पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील यांना हाताशी धरुन माढा मतदारसंघात येणार्या विधानसभा मतदारसंघात फिल्डिंग लावली होती. 23 एप्रिलला मतदान झाल्यानंतर माढ्यातून कोण? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. दावे आणि प्रतिदाव्यांमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष माढ्याकडे लागले होते. माढ्याची निवडणूक राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली होती. माढ्याच्या निकालावरच पुढील विधानसभा निवडणुकीचे भवितव्य ठरलेले आहे.
आज सकाळी मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी लीड घेतले होते. हे लीड शेवटपर्यंत संजयमामा शिंदे यांना तोडता आले नाही. संध्याकाळी उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती. आठव्या फेरीनंतर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे लीड थोडे-थोडे वाढत होते. परंतू पंधराव्या फेरीअखेर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी 20 हजारावर अधिक मताधिक्य मिळवले. शेवटी रणजितसिंहांचे वाढत चाललेले मताधिक्य संजयमामा शिंदे यांना कमी करणे शक्य झाले नाही. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे मताधिक्य पन्नास हजारापर्यंत पोहोचताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. शेवटच्या फेरीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना 5 लाख 83 हजार 191 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या संजयमामा शिंदे यांना 4 लाख 98 हजार 441 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या ऍड. विजयराव मोरे यांना 51 हजार 349 मते, अपक्ष उमेदवार दौलत शितोळे यांना 12 हजार 859 मते, तर इतर 28 उमेदवारांना पाचअंकी मतसंख्याही गाठता आली नाही. शेवटी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचा 84 हजार 750 मताधिक्याने पराभव केला. माढ्याची अभेद्य गढी काबिज करण्यात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी यश मिळवले आहे. दरम्यान, येणार्या विधानसभा निवडणुकांमध्ये फलटण विधानसभेचे गणित बदलणार आहे. यासंदर्भात ‘सातारा टुडे’ने याअगोदरच प्रकाशझोत टाकला होता. माढ्याची निवडणूक फलटणचा ‘गॉड फादर’ ठरवणारी होती. दरम्यान, रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेच फलटणचे ‘गॉड फादर’ आहेत, हेच माढ्याच्या विजयाच्या निमित्ताने त्यांनी दाखवून दिले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |