सातारा : खटाव येथील मंडलाधिकारी पन्नास हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या जाळ्यात सापडला असून एसीबीने ही कारवाई चक्क मंडलाधिकार्याच्या घरातच केल्यामुळे जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे. विजय खाडे-पाटील असे अटक केलेल्या या मंडलाधिकार्याचे नाव असून त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खटाव येथील मंडलाधिकारी विजय नामदेव खाडे-पाटील (वय 44) रा. खटाव जि. सातारा याने तक्रारदारास विनापरवाना वाळू व्यवसाय चालवायचा असेल तसेच वाळू वाहतूक करायची असेल तर कोणताही त्रास न देण्यासाठी व अवैध वाळू व्यवसायास मदत करतो, त्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची खासगी इसमामार्फत मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने सातारा येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार काल दि. 15 रोजी पन्नास हजार रुपयांची लाच स्विकारताना मंडलाधिकार्याला त्याच्या घरातच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. याप्रकरणी संशयित मंडलाधिकार्यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एसीबी साताराचे पोलीस उप निरीक्षक अशोक शिर्के यांनी दिली असून या कारवाईमध्ये पो. निरीक्षक अरिफा मुल्ला, अजित कर्णे, विशाल खरात, प्रशांत साठे, संजय साळुंखे यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान या कारवाईमुळे मात्र जिल्ह्यातील महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |