03:51pm | Jul 19, 2018 |
सातारा : तेटली, ता. जावली येथील बोगस सातबारा प्रकरणात सातारा महसूल विभागाला तोंड काळे करुन घ्यावे लागले होते. या प्रकरणाचा तपास सातार्यातील स्थानिक गुन्हे शाखेकडे आहे. हा तपास सुरु असतानाच ऑनलाईन सातबारा पोर्टलचा सर्व्हर तब्बल चार दिवस बंद असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक दुय्यम निबंधक कार्यालयातील जमीन खरेदी-विक्रीचे तसचे इतर व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या या ‘अडेलतट्टू’पणामुळे ऑनलाईन सातबार्याचा सातार्यात पुन्हा ‘बोजवारा’ उडाला आहे.
तेटली, ता. जावली येथील बोगस सातबारा प्रकरणात सातारा महसूल विभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी पेपरलेस योजनांपैकी एक असलेल्या ऑनलाईन सातबारा हे पोर्टल जावली तालुक्यातील एका रॅकेटने डिजिटल सिग्नेचरचा गैरवापर करुन त्याद्वारे बोगस सातबारे तयार करुन ते सातबारा पोर्टलवर अपलोड करण्यात आले होते. सर्वप्रथम ‘सातारा टुडे’ने हे बोगस सातबारा प्रकरण बाहेर काढले होते. त्यामुळे सातारा महसूल विभाग खडबडून जागा झाला होता. मात्र तेटली बोगस सातबारा प्रकरणात महसुलातीलच अनेक अधिकारी तसेच जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारीही अडकल्यामुळे हे प्रकरण वरच्या पातळीवरुन दाबण्यात येत आहे. सातारा महसूल विभागातील अनेक बडे अधिकारीही तेटली बोगस सातबारा प्रकरणाचा फास आपल्या गळ्याला विळखा घालेल, यामुळे नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र बोगस सातबारा सारखे गंभीर प्रकरण घडूनही महसुलातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तेटली बोगस सातबारा प्रकरणाचा ड्रॅगन आ वासून उभा असतानाच गेल्या चार दिवसांपासून ऑनलाईन सातबारा पोर्टलचा सर्व्हर डाऊन झाला आहे. वेळेवर जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार न झाल्यामुळे अनेकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. कोणाला दवाखान्यासाठी, कोणाला शिक्षणासाठी, तर कोणाला घरगुती कारणांसाठी पैशांची निकड असते. या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी वेळेचे फार मोठे महत्त्व असते. परंतू खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी लागणारे दुय्यम निबंधक कार्यालयातील ऑनलाईन सातबारा पोर्टलचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्यांनी खरेदी-विक्रीचे दस्त करण्यास असमर्थता दाखवली आणि पर्यटनाकडे मोर्चा वळवला. या गंभीर प्रश्नाकडे ना जिल्हाधिकार्यांचे लक्ष आहे, न महसुलातील इतर अधिकार्यांचे. त्यामुळे यासंबंधी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडलेला आहे.
ऑनलाईन सातबारा पोर्टलचे सर्व्हर डाऊन झाल्यानंतर जमीन खरेदी विक्री करणार्या अनेक लोकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत सातारा महसुलातील अनेक अधिकार्यांना फोनवरुन माहिती देण्यात आली. मात्र याबाबत काहीच माहिती नसल्याचा कांगावा या अधिकार्यांकडून करण्यात आला. त्यामुळे नक्की दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न अनेकांना यावेळी पडला. दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकार्यांनी व कर्मचार्यांनीही महसुल विभागाच्या नावावर महाबळेश्वर, पाचगणीसह कासच्या सहली आयोजित केल्या. सर्व्हरच डाऊन असल्यामुळे आम्ही करणार तरी काय, असा प्रतिप्रश्न दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकार्यांकडून नागरिकांना करण्यात आला. त्यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी आलेल्या लोकांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे. जिल्हा महसूल विभागाच्या या अडेलतट्टूपणामुळे राज्य शासनाचे मात्र कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाची घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. अधिकार्यांमध्येच मेळ नसल्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनाच आता सातारा जिल्हा महसूल विभागात लक्ष घालावे लागणार आहे. त्या संदर्भात सातारा महसूल विभागाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडेच करणार असल्याची माहिती भाजपच्या सातारा जिल्ह्यातील बड्या पदाधिकार्याने दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |