लोणंद : साखरवाडी ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्सने ऊसाचे बील थकवल्याने सालपे ता. फलटण येथील भगवान मारुती शिंदे (वय 83) यांनी आज दि. १७ रोजी राहत्या घरी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, सालपे येथील शेतकरी भगवान मारुती शिंदे यांनी आत्महत्या केल्याची खबर त्यांचे पुतण्या तात्याबा नारायण शिंदे यांनी लोणंद पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. भगवान मारुती शिंदे यांनी बैठकीच्या खोलीत पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लग्न पत्रिकेच्या कव्हरवरती आत्महत्येचे कारण लिहिलेला कागद पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आपले साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स साखर कारखान्यातील ऊसाचे बिल न दिल्याने जिवाला व आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझे कुणाशी वैर नसून माझ्या मुलीला व वाड्यातील माणसांना या प्रकरणी कोणीही त्रास देऊ नये अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. दरम्यान एका वृद्ध शेतकऱ्याने साखर कारखान्याच्या बुडवेगिरीमुळे आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी लोणंद पोलीस गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिनेश कुंभार करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |