03:53pm | Dec 17, 2018 |
सातारा : गेली अनेक दशके फलटण तालुक्यात गोवंशाची कत्तल सुरु होती. परंतू 2015 साली राज्य शासनाने गोवंश हत्त्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आल्यानंतर राज्यभरात गोवंश हत्त्येवर बंदी आली होती. मात्र, फलटणमध्ये गोवंशाची कत्तल राजरोसपणे सुरु होती. 20 मे 2018 रोजी परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी फलटणमधील नगरपालिकेच्या कत्तलखान्यावर छापा मारुन शेकडो गोवंशाचे मांस व गोवंश ताब्यात घेतला होता. त्यामुळे फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोवंशाची हत्त्या होत असल्याचे सिद्ध झाले आहे.
काल दि. 16 रोजी बारामती तालुक्यातून फलटण येथील कत्तलखान्यात कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंश प्रजातीमधील जनावरांचा टॅम्पो बारामती पोलिसांनी अडवून जनावरे ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी तौफीक इम्तियाज कुरेशी रा. कुरेशी मोहल्ला, फलटण, अब्दुल इनामदार रा. सासवड, ता. फलटण हे बारामती तालुक्यातून पांढर्या रंगाचे बैल, जरसी गाय, 25 वासरे कत्तलीसाठी फलटण येथील कत्तलखान्यात घेवून जात असताना सावळ, ता. बारामती येथे हा टॅम्पो ताब्यात घेतला. संबंधित आरोपींवर या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची बदली होताच पुन्हा एकदा फलटण येथील ‘बिफ माफियांनी’ डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. फलटण येथील नगरपालिकेच्या मालकीच्या असणार्या कत्तलखान्यात यापूर्वी गोवंशाची कत्तल होत होती. मात्र मुंबई येथील उच्च न्यायालयाने व महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या पशू कल्याण समितीचे ऍनिमल वेलफेअर ऑफिसर यतीनभाई जैन यांनी दि. 20 मे रोजी फलटण येथील तत्कालीन परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या सहकार्याने फलटण येथील कत्तलखान्यावर छापा मारला होता. या छाप्यामध्ये शेकडो गोवंशाचे मांस, कातडी व इतर अवयव जप्त केले होते. तसेच कत्तलीसाठी आणलेली अनेक जनावरेही ताब्यात घेण्यात आली होती. या कारवाईमुळे फलटणमधील बिफ माफियांचे कंबरडे मोडले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी फलटणमधील अवैध गोवंश कत्तली प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यामुळे अनेक बिफ माफिया बिळात लपून बसले होते. मात्र, सध्या बिफ माफियांनी पुन्हा एकदा डोके वरती काढण्यास सुरुवात केली आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर येथून मोठ्या प्रमाणावर गोवंशाची तस्करी करुन त्याची कत्तल फलटणमध्ये केली जात आहे. हेच मांस आखाती देशांमध्ये निर्यात केले जात आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड माफिया दाऊद इब्राहिम व त्याचा उजवा हात समजल्या जाणार्या छोटा शकीलचे मुंबई येथील बिफ माफियांशी व्यवसायिक संबंध आहेत. मुंबई येथील बिफ माफिया फलटण येथून मोठ्या प्रमाणावर गोमांस (बिफ) खरेदी करीत असतात. हेच बिफ मुंबई, ठाणे तसेच आखाती देशांमध्ये खाण्यासाठी पाठवले जाते. त्यामुळे फलटण येथील गोमांसाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये फलटण शहरात व परिसरात गोवंशाची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे. मात्र, फलटण पोलिसांनी या अवैध कत्तलीवर कारवाई करण्याचे धाडस अद्याप दाखवलेले नाही. अनेक बिफ माफिया फलटणमध्ये महागड्या गाड्यांमधून येतात. रात्रीच्या अंधारात अनेकांना बॉक्समधून गिफ्ट देतात. परंतू याची खबर कोणालाही कानोकान लागत नाही. त्यामुळे बिफ माफियांचे साटेलोटे फलटणमधील पुढार्यांपासून पोलीस अधिकार्यांपर्यंत असल्याचे नाकारता येवू शकत नाही.
काल बारामती ग्रामीण पोलिसांनी फलटणमध्ये कत्तलीसाठी जाणार्या जनावरांचा टॅम्पो ताब्यात घेवून तस्करी करणार्यांवर कारवाई केली आहे. मात्र, फलटण पोलिसांना ही तस्करी दिसत नाही का, असा प्रश्न तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना तसेच गोवंश प्रेमींनी केली आहे.
अलगुडवाडीतील ‘त्या’ कत्तलखान्यावर कारवाई होणार काय?
राज्यात 2015 साली गोवंश हत्त्याबंदी कायदा अस्तित्वात आल्यानंतर राज्यभरात गोवंश हत्त्येवर निर्बंध आले. मात्र, हे निर्बंध फाट्यावर मारुन फलटणमधील एका शक्तीशाली पुढार्याचे राजकीय वजन वापरुन अलगुडवाडीतील बिफ कारखान्यात राजरोसपणे गोवंशाची कत्तल होत होती. या कारखान्यात गोठवलेले हजारो टन बिफ मुंबई, ठाणे तसेच आखाती देशांमध्ये निर्यात केले जात होते. तसेच फलटणमधील नगरपालिकेच्या कत्तलखान्यात कत्तल केलेल्या गोवंशाचे मांसही अलगुडवाडीतील कत्तलखान्यात पाठविण्यात येते, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत आहेत. परंतू बारामती येथे गोवंश तस्करी प्रकरणी कारवाई केल्यानंतर फलटणमधील अलगुडवाडीतील ‘त्या’ कत्तलखान्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |