सातारा : स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने म्हसवड येथे कारवाई करत दुचाकी चोरणारी टोळी गजाआड केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख रूपये किमतीच्या 5 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अमोल दिलीप लोखंडे (वय 24) व अल्पवयीन ज्ञानेश्वर उर्फ गुंड्या तुपे (दोघेही रा. मल्हारनगर, म्हसवड, ता. माण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
सातारा जिल्ह्यात दुचाकी चोरींचे प्रमाण वाढल्याने या दुचाकी चोरी करणार्या टोळ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाकडून कार्यवाही सुरू होती. त्या अनुशंघाने एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक सागर गवसणे हे म्हसवड येथे पथकासह गस्त घालत होते. शुक्रवारी त्यांना शहरामध्ये विना क्रमांकाच्या दुचाकीवर अमोल लोखंडे व ज्ञानेश्वर उर्फ गुंड्या तुपे हे फिरताना आढळले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या एका साथीदाराने ही दुचाकी एस.टी स्टँड परिसरातून चोरी केल्याचे सांगितले. आता ही दुचाकी विक्री करण्यासाठी आलो असल्याचे त्या इसमांनी सांगितले.
यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर अमोल व ज्ञानेश्वर यांनी त्याच्या साथीदाराच्या सहाय्याने म्हसवड, माळशिरस, पिलीव, सोनहिरा कारखाना येथून दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 2 लाख रूपये किमतीच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत पोनि पद्माकर घनवट, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, ज्योतिराम बर्गे, पोना मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, रूपेश कारंडे, वैभव सावंत, मयूर देशमुख, गणेश कचरे व मारूती अडागळे यांनी सहभाग घेतला होता.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |