03:47pm | Aug 17, 2018 |
सातारा : गुंफण अकादमी व यशवंतराव चव्हाण विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पुस्तक प्रकाशन व गुंफण पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
ज्योतिर्विद प्राचार्य रमणलाल शहा लिखित 'आम्ही जिंकिला संसार' या संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ग्रंथाच्या दुस-या आवृत्तीचे, तर डॉ. बसवेश्वर चेणगे लिखित 'प्रश्नवेध' या समाजातील ज्वलंत प्रश्नांचा लेखाजोखा मांडणा-या लेखसंग्रहाच्या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात होणार असून प्राचार्य रमणलाल शहा यांच्या पंच्याऐशीव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. तसेच कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, संगम उद्योग समुहाचे बाळासाहेब कुलकर्णी, राज्य शिक्षक संघाचे संपर्वâप्रमुख सिध्देश्वर पुस्तके, सामाजिक कार्यकर्ते कल्याण कांबिरे, व्याख्याते रामानंद तपासे (गेवराई, जि. बीड) व वास्तुशास्त्र अभ्यासक नेहा शहा यांना याप्रसंगी गुंफण गुणगौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, ग्रामीण कथाकार बबन पोतदार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बसवेश्वर चेणगे, नितीन शहा व गजानन चेणगे यांनी केले आहे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |