04:18am | May 24, 2019 |
सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील हाय-व्होल्टेज लढतीत जवळपास सव्वा लाखाच्या (१,२६,५२८) मताधिक्क्याने विजयश्री नोंदवत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी हॅट्ट्रिक साजरी केली. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला अभेद्य ठेवला. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा त्यांनी पराभव केला. मात्र, उदयनराजे यांना कडवी लढत देऊन नरेंद्र पाटील यांनी त्यांचे मताधिक्क्य जवळपास २ लाख ४० हजारांनी खाली आणले. दरम्यान, निकालानंतर साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोश केला.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी सातारा मतदारसंघात मतदान झाले होते. ६०.३३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. एकून १८ लाख २३ हजार ४७६ मतदारांपैकी ११ लाख ९ हजार ४२९ मतदारांनी मतदान केले होते. निवडणुकीच्या रिंगणात एकून नऊ उमदेवार होते. मात्र मुख्य लढत शिवसेनेच नरेंद्र पाटील व राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांच्यातच अटीतटीची झाली. वंचित बहुजन आघाडीचे अॅड. सहदेव ऐवळे यांच्यामुळे मतविभाजन होईल व ते उदयनराजे यांच्यासाठी अडचणीचे ठरेल अशी अटकळ बांधली जात होती. पण ऐवळे जेमतेम ४० हजारच्या आसपास राहिल्याने उदयनराजे सेफ झोनमध्ये राहिले. उदयनराजे यांना थेट लढतीत नरेंद्र पाटील यांनी कडवी लढत दिल्यामुळे येथील निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे निकालाच्या बाबतीत प्रचंड औत्सुक्य होते. आज सकाळी आठ वाजता सातारा औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामात कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळी अकराच्या सुमारास पहिल्या फेरीची आकडोवारी हाती आली. त्यामध्ये उदयनराजे यांनी २९ हजार ८९६, तर नरेंद्र पाटील यांना २१ हजार ५८१ मते मिळाली. पहिल्या फेरीतच उदयनराजे यांनी ८ हजार ३१५ मतांची आघाडी घेतली. पुढील एकेका फेरीच्या कलाबरोबर उदयनराजे यांचे मताधिक्क्य वाढत गेले.
अकराव्या फेरीअखेर मोजलेल्या ४ लाख १५ हजार ४२८ मतदानापैकी २ लाख ११ हजार २५२ मते घेत उदयनराजे यांनी नरेंद्र पाटील यांच्यावर ३९ हजार २२५ मतांची आघाडी घेतली. २३ व्या फेरीअखेर उदयनराजे यांना ५ लाख ७९ हजार ०२६, तर नरेंद्र पाटील यांना ४ लाख ५२ हजार ४९८ मते मिळाली. उदयनराजे यांनी १ लाख २६ हजार ५२८ मतांनी विजयी आघाडी घेतली. शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचा गृहतालुका असलेल्या पाटण तसेच कराड दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघांनी त्यांना मताधिक्क्य दिले. पण कराड उत्तर, कोरेगाव, वाई व सातारा विधानसभा मतदारसंघातून उदयनराजे यांना चांगले मताधिक्क्य मिळाले. तेच निर्णायक ठरल्यामुळे उदयनराजे यांचा विजय सुकर झाला. लोकसभेच्या २००९ व २०१४ या दोन्ही निवडणुकीत उदयनराजे यांनी विक्रमी मताधिक्क्य घेतले होते. गेल्यावेळी ३ लाख ६६ हजार ५९४ मतांनी त्यांनी विजय मिळवला होता. यावेळी शिवसेनेने भाजप व मित्रपक्षांच्या भक्कम एकजुटीच्या जोरावर उदयनराजे यांना तगडे आव्हान निर्माण केल्यामुळे येथील निकाल काय लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महायुतीने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे निकालाविषयी अनेकांच्या पैजा लागल्या होत्या. या घनघोर लढतीत उदयनराजे विजयी झाले, पण त्यांचे मताधिक्क्य २ लाख ४० हजारांनी घटले. निकालातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निवडणूक रिंगणातील अन्य उमेदवार मतांचा पाचअंकी आकडाही गाठू शकले नाहीत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |