सातारा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून चार दिवसानंतर मंगळवारी सोलापूर जिल्ह्यात गेली. पालखीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी सातारा पोलिस दलातील एलसीबीचे पोलिस फुगे विक्रेत्यांपासून वारकरी पोशाखामध्ये राहून एकूण 90 चेनस्नॅचर, पिकपॉकीटर, खूनाच्या प्रयत्न करणारे, दरोडा, जबरी चोरीतील संशयित पोलिसांनी पकडले आहेत. लाखो लोकं सहभागी झालेल्या एवढ्या मोठ्या वारीमध्ये सुद्धा सातारा पोलिसांनी हुशारी दाखवून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आम्ही किती 'स्मार्ट' आहोत हे दाखवून दिले आहे.
ज्ञानेश्वर माउलींची आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे पालखी दरवर्षी जात असते. या पालखी सोहळ्यामध्ये परदेशी पाहुण्यांपासून विविध राज्यातील लाखो भावीक सामील असतात. अशा या भक्तीभावाने निघणार्या वारीमध्ये चोरट्यांचीही नजर असते. वारीदरम्यान, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्या त्या जिल्ह्यातील पोलिस खबरदारी घेत असतात. यंदा सातार्यात पालखी चार दिवस मुक्कामाला असल्याने सातारा जिल्हा पोलिस दलावर बंदोबस्ताचा ताण होता.
पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग तथा एलसीबीचे पोनि पद्माकर घनवट, सपोनि विकास जाधव, फौजदार प्रसन्न जर्हाड,सागर गवसणे, शशिकांत मुसळे यांच्यासह कर्मचारीही बंदोबस्तासाठी आदल्या दिवसांपासून तैनात होते. चोरट्यांचा योग्या वेळेतच बंदोबस्त व्हावा, यासाठी एलसीबीचे पोलिस चक्क साध्या वेशात फुगे विक्रेते, फळविक्रेत्यांसह चक्क वारकरी बनून ‘नजर’ ठेवून होते.
या कामगिरीच्या जोरावरच चार दिवसांत पोलिसांनी चक्क एकूण 90 संशयितांची धरपकड केली आहे. यामध्ये काही गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. तसेच एका जबरी चोरीतील चोरट्याकडून 75 हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे. वारीतील अशा पोलिस बंदोबस्तामुळे कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसून उलट त्याचा फायदा झाल्याने पोलिस कर्मचार्यांचे पोलिस दलातून अभिनंदन होत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |