कॅनडा : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. कॅनडातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आम्ही सर्वोपतरी सर्व प्रयत्न केले, पण वेळ आली होती. जे कोणी त्यांच्या आयुष्यात आलं त्यांच्यावर ते प्रचंड प्रेम करायचे’, अशी प्रतिक्रिया सरफराज खान याने दिली आहे.
कादर खान यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने कॅनडातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, कादर खान यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. कॅनडामध्येच कादर खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कादरखान यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३७ रोजी काबूलमध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची, नाट्यलेखनाची आवड होती. १९७३ मध्ये 'दाग' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. चार दशकांमध्ये ३००हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली. त्यांचं विनोदाचं टायमिंग अफलातून होतं. त्यामुळं सुरुवातीच्या काळात खलनायक म्हणून पडद्यावर अवतरलेले कादर खान नंतर लोकांना पोटभर हसवत राहिले. कादर खान-अमिताभ, कादर खान-गोविंदा यांच्यासोबत त्यांनी केलेले चित्रपट सुपरहिट ठरले.
कादर खान यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. गोविंदासोबत त्यांची जोडी प्रेक्षकांना जास्त भावली. आँखे, मै खिलाडी तू अनाडी, जुदाई, खून भरी मांग, बिवी हो तो ऐसी, बोल राधा बोल, जुडवा अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांचा अभिन्य पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. आपल्या 45 वर्षांच्या करिअरमध्ये कादर खान यांनी दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि गोविंदासोबत सर्वात जास्त काम केलं. 1990 चा काळ या तिघांनी अक्षरक्ष: गाजवला होता. साजन चले ससुराल, हिरो नंबर 1, कुली नंबर 1, दुल्हे राजा, हसीना मान जायेगी असे अनेक सुपरहिट चित्रपट तिघांनी केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |