सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाने नदी व ओढ्याकडेच्या वाळू उपशासाठी ऑनलाईन पद्धतीने 16 वाळू ठिय्यांचा लिलाव जाहीर केला आहे. हा ठेका आपल्या समर्थकांनाच मिळावा यासाठी सातार्यात व्हाईट कॉलर वाळू माफियांचे वाळू ठेक्याकडे बारकाईने लक्ष लागले आहे. या बदल्यात मिळणारा कोट्यवधींचा मलिदा हेच याचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होत आहे.
पूर्वी दगड, विटा, माती आणि वाळूचे काम कष्टकरी समाज करीत होता. कधीही जेसीबी यंत्रणा लावण्यात येत नव्हती. खेचर व गाढवाच्या पाठिवर वाळूची वाहतूक करताना रोजगार मिळतोय याचा आनंद होता. स्थानिकांना बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत होती. यामध्ये एकमेकांची गरज भागवणे एवढीच मर्यादित अपेक्षा होती. गावातील प्रतिष्ठीत लोक या व्यवसायापासून चार हात लांबच राहणे पसंत करत होते. सध्या वाळूचा दर 5 ते 6 हजार रुपये प्रति ब्रास झाला आहे. त्यामुळे वाळूला मागणी जास्त, पण पुरवठा कमी अशी परिस्थिती असली तरी गेले अनेक दिवस न्यायालयाच्या आदेशामुळे वाळूचा लिलाव होवू शकलेला नव्हता. त्याचा मोठा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसला होता. सध्या सातार्यात 86 हजार 777 ब्रास वाळूचा लिलाव होणार आहे. त्याची बाजारपेठेतील किंमत 45.75 कोटी इतकी असली तरी सुमारे सव्वा लाख ते दीड लाख वाळू उपसा करुन शंभर कोटी रुपये वाळू माफिया, व्हाईट कॉलर, भ्रष्ट अधिकारी आणि दलाल यांच्याकडे जाणार, हे निश्चित झाले आहे.
आता वाळू माफियांच्या कक्षा रुंदावल्या असून पुणे, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, सांगली, मुंबई येथील वाळू व्यावसायिक स्थानिक व्हाईट कॉलर नेत्यांच्या माध्यमातून वाळूचे वाटेकरी बनू पाहत आहेत. अनाधिकृत वाळू उपशामुळे नदी व ओढे-नाल्यांचे पात्र बदललेले आहे. अनाधिकृतरित्या वाळू ठेक्याशेजारील होणार्या वाळू उपशाने अनेकांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अशा अभागी कुटूंबाबद्दल या व्हाईट कॉलर नेत्यांना काहीच वाटत नाही. राजकीय मंचकावर एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे नेते वाळू ठेक्याबाबत एकमेकांच्या हातात हात घालून साथी हात बढाना, म्हणत वाळू लिलावात भाग घेवू लागले आहेत. जावली तालुक्यातील बामणोली, शेते, सोमर्डी हद्दीमध्ये दिवसरात्र बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांना चिंता वाटत असली तरी प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्याचा प्रसाद मिळत असल्याने या विषयाबाबत सर्वांनीच मौन धारण केले आहे. अशीच परिस्थिती सातारा जिल्ह्यात सर्वत्रच पहावयास मिळत आहे. या लिलावामुळे वाळूचे दर कमी होतील, तसेच अर्धवट झालेली बांधकामे पूर्ण होतील, असा दावा केला जात आहे. परंतू व्हाईट कॉलर नेत्यांना कार्यकर्त्यांची सोय पाहताना आपली सोय करुन घ्यावी लागत आहे, याचे आश्चर्य आता सामान्यांना वाटत नाही ही शोकांतिका आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |