05:36pm | Apr 27, 2018 |
सातारा : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला नवीन आक्रमक चेहरा देण्याबाबतच्या हालचाली गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत. गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पानीपत झाले होते. गेली अनेक वर्षे दोन नंबरवर असलेला हा पक्ष अचानक चौथ्या नंबरवर फेकला गेला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्या पश्चिम महाराष्ट्राने नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीला हात दिला. नुकतेच राष्ट्रवादीचे विद्यमान अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी विधानसभा गाजविणारे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. शशिकांत शिंदे, माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची नावे चर्चेत होती. परंतू माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र सर्वाधिक पसंती शशिकांत शिंदे यांच्या नावालाच दर्शविली आहे. परंतू जिल्ह्यातीलच काही राष्ट्रवादीजणांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाला विरोध केल्याची चर्चा सातार्यात होत आहे.
मुंबईमध्ये माथाडी नेतृत्व म्हणून उदयास आलेले शशिकांत शिंदे यांच्यावर सार्थ विश्वास ठेवून राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी 1999 सालच्या जावली-महाबळेश्वर विधानसभा निवडणुकीचे तिकिट शशिकांत शिंदे यांना दिले होते. शिवसेनेचे तत्कालीन आ. सदाशिव सपकाळ यांचा मोठ्या मतांच्या फरकाने शिंदे यांनी आपली ताकद राष्ट्रवादीला दाखवून दिली होती. मतदारसंघ पुनर्रचनेत 2009 साली शशिकांत शिंदे यांच्या जावली-महाबळेश्वर मतदारसंघाचे विभाजन झाले. माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर शालिनीताई पाटील यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केल्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी आ. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. याहीवेळी शिंदे यांनी करिश्मा करीत मोठ्या फरकाने शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीचा खरा वारसदार म्हणून शशिकांत शिंदे यांच्याकडे पाहिले जात होते. त्याची उतराई म्हणून माजी मंत्री व विधान परिषदेचे विद्यमान सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांना मंत्रिपदाच्या गादीवरुन उतरवून पोत्यावर बसविण्याचे काम अजित पवार यांनी करुन शशिकांत शिंदे यांच्या गळ्यामध्ये जलसंपदा तथा पालकमंत्री पदाची माळ घातली होती. तेव्हापासूनच फलटणचे पुढारी शशिकांत शिंदे यांना पाण्यामध्ये पाहू लागले. शशिकांत शिंदे यांचे राजकीय खच्चीकरण करण्याची एकही संधी मिस्टर रामराजेंकडून सोडली गेली नाही. शशिकांत शिंदे हे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे. नवी मुंबईमध्ये बसून हजारो माथाडी कामगारांचे नेतृत्व ते करतात. भारतातील सर्वात मोठ्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे पान शशिकांत शिंदेशिवाय हलू शकत नाही. बेलापूर, वाशी, कोपरखैरणे या विधानसभा मतदारसंघात शिंदे यांची मोठी ताकद आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिंदे यांची भूमिका महत्त्वाची समजली जाते.
देशात नरेंद्र मोंदींचे वारे असतानाही माजी मंत्री गणेश नाईकांच्या डोक्यावर हात ठेवून नवी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता राखण्याचे काम शिंदे यांनी केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार व विधीमंडळ गटनेते तथा माजी उपमुख्यमंत्री यांच्या खास मर्जीतले म्हणून शशिकांत शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. शशिकांत शिंदे यांच्या प्रसिद्धीची हीच चढती कमान राष्ट्रवादीतील झारीतील काही शुक्राचार्यांना व फलटण नरेशांना आवडत नाही. जिल्ह्याचा कारभारी मीच, या फुक्या अविर्भावात फलटण नरेश वावरत असतात. मानाची व धनाची पदे माझ्याच घरात असावीत, असा हेका फलटण नरेशांचा असतो. काही अंशी ते यशस्वीही झाले आहेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते. बहुजन समाजातील मुलांना त्यांनी आमदार, खासदार, मंत्री केले. त्यांचेच मानसपुत्र समजले जाणारे राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारही सातारा जिल्ह्यातील सत्तेचे विकेंद्रीकरण करणार काय? भाकरी फिरविण्यात तरबेज असणारे पवार भाकरी फिरवणार, की करपवणार? प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये आ. शशिकांत शिंदे यांच्याबाबत पवारांचा हा फॉर्म्यूला कसा चालतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. फलटण नरेश नेहमीप्रमाण शशिकांत शिंदे यांच्याबाबत देव पाण्यात घालून बसलेलेच असणार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या सातारा जिल्ह्याला संधी मिळणार काय? असा सवाल शशिकांत शिंदे यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते विचारु लागले आहेत, की पुन्हा फलटण नरेशांच्या आहारी जावून राष्ट्रवादी सुप्रिमो या शर्यतीमध्ये शशिकांत शिंदेंना ‘खो’ घालणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |