03:58pm | May 08, 2018 |
फलटण : भारतीय राज्यघटनेने देशात जन्मास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला समसमान अधिकार दिले आहेत. कोणीही मोठा, अथवा छोटा असे आपली राज्यघटना मानत नाही. सध्या महिला सबलीकरणाच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरु आहे. महिलांचा सन्मान हाच देशाचा सन्मान असे असताना फलटण नगरपालिकेत काल झालेल्या सर्वसाधारण सभेत फलटण पालिकेचे उपनगराध्यक्ष नंदु भोईटे यांनी मागासवर्गीय नगरसेविका ज्योती खरात यांना सभेत बोलण्याची संधी न देता सभा संपल्याचे जाहीर केले तसेच त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने त्यांना सभागृहातच रडू कोसळले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला सबलीकरणासाठी नेहमीच आग्रही असते. खासदार सुप्रियाताई सुळे, खा. विद्या चव्हाण तसेच अन्य महिला पदाधिकारी राष्ट्रवादीच्या सर्वच उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेत असतात. खा. सुप्रियाताई सुळे यांनी तर गावोगावी जावून महिलांना ताकद देण्याचे काम केले आहे. नारी सबलीकरणासाठी त्या नेहमीच आघाडीवर असतात. महिलांच्या हक्कांसाठी सदैव लढा देणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडे पाहिले जाते. असे असताना काल फलटण नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष नंदकुमार आबाजी भोईटे उर्फ नंदु भोईटे यांनी फलटण नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये स्वत:च्या अध्यक्षतेखाली विकासकामांबाबत पालिकेची सर्वसाधारण सभा घेतली होती. सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी बाकावरील नगरसेवकही यावेळी उपस्थित होते. शहरातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात येत होती. तसेच विविध विकासकामांच्या याद्याही मागविण्यात आल्या होत्या. त्या याद्यांबाबत विचार करुन प्रस्ताव सादर करण्यासंबंधात चर्चा झाली. नगरसेवक सचिन अहिवळे यांनी दलित विकास निधी सोडून नफा फंडातून कामे मिळाली पाहिजेत, अशी मागणी केली. त्याच धर्तीवर नगरसेविका ज्योती खरातही आपल्या प्रभागांच्या प्रश्नांसंदर्भात बोलण्यासाठी उभ्या राहिल्या असता, उपनगराध्यक्ष भोईटे यांनी सभा संपल्याचे घोषित केले, यावेळी नगरसेविका खरात यांनी मला बोलायचे आहे, असे निक्षून सांगितले. मात्र उपनगराध्यक्ष भोईटे यांनी आपला आवाज वाढवत नगरसेविका खरात यांना अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकारामुळे नगरसेविका खरात यांना सभागृहातच रडू कोसळले. मात्र फलटणच्या नेत्यांप्रमाणेच त्यांचे कार्यकर्तेही किती बेमुरर्वतखोर आहेत, याचे उत्तम उदाहरण काल फलटण पालिकेत बघायला मिळाले.
काही वर्षांपूर्वी फलटण पालिकेतील सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेच्या प्रकल्पाधिकारी जयश्री भोईटे यांना तत्कालीन नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी धक्काबुक्की करुन जातीवाचक शिवीगाळ केली होती. यावेळी मोठा गदारोळ झाला होता. सातारा टुडे ने हे प्रकरण प्रथमपासून धसास लावले होते. पोलिसांच्या योग्य तपासामुळे पांडुरंग गुंजवटेला न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर पांडुरंग गुंजवटे फलटणमधून निवडून येवू शकला नाही, हा इतिहास आहे. जो महिलांचा सन्मान करीत नाही, त्याची अवस्था पांडुरंग गुंजवटेसारखी होते. नंदू भोईटे हे सुद्धा सध्या पांडुरंग गुंजवटेच्या पावलावर पाऊल टाकीत मार्गक्रमण करीत आहेत. पैसा आणि सत्ता आली की भल्याभल्यांना माज येतो. काल फलटण पालिकेत झालेला प्रकारही या माजातूनच झालेला आहे. या प्रकरणात विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी कडक भूमिका घेवून नंदू भोईटेला पालिकेत पाय ठेवता येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. अशा पिसाटलेल्या प्रवृत्तींमुळे फलटण पालिकेतील महिलांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे.
फलटण पालिका हे सत्ताधार्यांसाठी फक्त चरण्याचे कुरण आहे. पालिकेच्या पैशातून कोणाची घरे चालतात, हे फलटणकरांना चांगलेच ठावूक आहे. पूर्वी फलटण पालिकेत विरोधी बाकांवरील संख्या कमी होती. सध्या विरोधी बाकावर बसणारे सदस्य जास्त आहेत. असे असतानाही पालिकेतील एका महिला लोकप्रतिनिधीवर असा प्रसंग गुदरत असताना खरेतर विरोधी सदस्यांनी एकत्रितपणे संबंधिताला कानफटायला हवे होते. परंतू शिष्टाचाराचे भान राखून विरोधकांनी हा प्रश्न तात्पुरता बाजूला ठेवला असावा. राष्ट्रवादी राज्यभरात महिलांचा सन्मान करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो, अशा फुशारक्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मारीत असतात. मात्र स्वराज्य संस्थांच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांकडून महिलांचा पदोपदी अवमान केला जातो. त्यांचे खच्चीकरण केले जाते. अशा गोष्टींकडे मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कानाडोळा करतात की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान फलटण पालिकेतील विरोधी बाकावरील नगरसेविका ज्योती खरात यांना अपमानास्पद वागणूक देवून रडविणार्या उपनगराध्यक्ष भोईटेंवर फलटणमधील राष्ट्रवादीचे जाणते नेते काय कारवाई करणार, याकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे.
‘बॅचलर’ पदाधिकार्यांमुळे फलटण पालिकेतील महिलांचे अस्तित्व धोक्यात ?
फलटण पालिकेत मोस्ट बॅचलर पदाधिकारी म्हणून पांडुरंग गुंजवटे आणि नंदकुमार भोईटे यांना ओळखले जाते. या दोघांनीही अधिकृतरित्या लग्न केलेली नाहीत. अशांना फलटणच्या पुढार्यांनी डोक्यावर हात ठेवून नगरसेवक केले. घरात घेण्याच्या लायकीचे नसणारे ज्यावेळी पालिकेत येतात, त्यावेळी काय होते हे फलटणकरांनी याची देही याची डोळा पाहिलेले आहे. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेच्या प्रकल्पाधिकारी जयश्री भोईटे यांना तत्कालीन नगरसेवक पांडुरंग गुंजवटेने धक्काबुक्की तसेच जातीवाचक शिवीगाळ करुन विनयभंग केला होता. गुंजवटे त्याच्या कर्माची फळे सध्या भोगत आहे. मात्र यापासून कोणताही बोध न घेता नंदू भोईटेने काल एका महिलेला अपमानास्पद वागणूक देवून तिचा पाणउतारा केला आहे. त्यामुळे असे मोस्ट बॅचलर पदाधिकारी फलटण पालिकेतील महिलांसाठी विकृत ठरत आहेत, अशी चर्चा फलटण शहरात होत आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |