सातारा : सक्रिय राजकारणापासून अलिप्त होण्याचा निर्णय जाहीर करीत 'मनसे'चे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांनी पक्षाच्या सर्व जबाबदारीतून मुक्त होत असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. व्यक्तीगतरित्या स्वत: राजकारणातून दूर होत असलो तरी पक्षातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या पदांवर कायम राहून राजकीय प्रवाहात राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात संदीपदादा मोझर यांनी म्हटले आहे की, महाविद्यालयीन जीवनापासून मी समाजकार्यात सक्रिय आहे. समाजाच्या कल्याणासाठी स्वत:च्या घरदार, शेतीवाडीचा त्याग करुन धोम प्रकल्पग्रस्त म्हणून आमच्या पूर्वजांनी त्यागाचा वारसा घालून दिला आहे. त्याच परंपरेचे पाईक म्हणून मी राजकारण, समाजकारणात सक्रिय झालो. खोट्या गुन्ह्यात अडकवून मला कारावासही भोगावा लागला. मात्र तुरुंगातून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मनसेचे राज्य उपाध्यक्षपद आणि महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रमुख संघटकपदही बहाल केले. पक्षाच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी अक्षरश: जीवाचे रान केले. पक्षनेतृत्वानेही माझ्यावर विश्वास दाखवून माझी नेहमीच पाठराखण केली. पक्षाचे संस्थापक आदरणीय राजसाहेब कार्यक्रमाच्या निमित्ताने सातार्यात आल्यावर माझ्या निवासस्थानीही आले होते. त्यांच्या माझ्यावर विशेष स्नेह आहे. माझ्या शब्दाखातर अनेक कार्यकर्त्यांना पक्षातील जबाबदारीची पदे दिली. त्यांच्या या विश्वासाबद्दल मी त्यांचा कायम कृतज्ञच राहेन. मात्र माझ्या व्यावसायिक नवभरारीसाठी आणि कुटुंबास पुरेसा वेळ देण्यासाठी सक्रिय राजकारणापासून अलिप्त होण्याचा निर्णय मी घेत आहे. पक्षात प्रवेश करतानाच ङ्गमनसेफहा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष असेलफ ही केलेली घोषणा सत्यात आणत, यापुढे कोणताही राजकीय पक्ष, संघटना यामध्ये सक्रिय न होता व्यवसायाकडे पूर्ण वेळ लक्ष देवून त्या बरोबरीने समाजसेवेचे व्रत जोपासणार असल्याचेही संदीपदादांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
भविष्यात स्वत: कोणतीही निवडणूक लढवणार नसलो आणि आपण स्वत: पक्षीय राजकारणातून दूर होत असलो तरी, आपणावर विश्वास ठेवून ङ्गमनसेफत आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक यांनी आपापल्या पदांवर कायम राहून राजकारण, समाजकारणात सक्रिय रहावे, माझ्या पाठोपाठ कोणीही पक्षाचा व पक्षातील पदांंचा त्याग करु नये, असे आवाहनही संदीपदादा मोझर यांनी केले आहे. मी पक्ष सोडत असलो तरी, अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही किंवा कोणतीही संघटना स्थापून त्याद्वारे राजकारण करणार नाही. मात्र माझ्यावर विश्वास दाखवून सुरु झालेली विविध आंदोलने तडीस नेण्यासाठी तसूभरही मागे हटणार नाही. आजवरची सर्व आंदोलने पूर्वीप्रमाणेच एव्हाना पूर्वीपेक्षा अधिक गतीने सुरु ठेवण्यात येतील, असेही संदीपदादांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
समाजातील पिडीत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना जीवाचे रान करुन लढायला शिकवले त्याचप्रमाणे यापुढेही संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली ताकद पणाला लावणार असून आजवर पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, नेतेमंडळी, महाराष्ट्र सैनिक आणि जनता जनार्दनासह, विविध आंदोलकांनी आपणावर भरभरुन प्रेम केले, सन्मान दिला, आदर केला त्याबद्दल मी सदैव कृतज्ञ राहणार असून आपल्या अनुभवाचा फायदा समाजातील गरजूंना व्हावा म्हणून मार्गदर्शकाच्या भूमिकेतून आणि समाजात चांगले घडावे, यासाठी समाजातील उदात्त, उत्तम आणि आदर्श समाजघटकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. मात्र सक्रिय राजकारणापेक्षा कौटुंबिक जबाबादारी, व्यावसायिक जडणघडणीकडेच अधिक लक्ष देणार आहे, असेही या प्रसिद्धीपत्रकात संदीपदादा मोझर यांनी म्हटले आहे.
माझ्या आजवरच्या राजकीय, सामाजिक जीवनात वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी भरभरुन सहकार्य केले. त्यांच्या सक्रिय योगदानामुळेच माझी जडणघडण उत्तमरित्या झाली, याची कृतज्ञ जाणीव असल्याचा उल्लेखही संदीपदादा मोझर यांनी प्रसिद्धीपत्रकात केला असून, भविष्यातील वाटचालीसाठीही हे प्रेम अखंड राहावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |