कराड : पाच वर्षांच्या युती सरकारच्या काळामध्ये केलेल्या नोटबंदी व जी एस टी यासारख्या हुकूमशाही पध्दतीतीच्या निर्णयामूळे बेरोजगारी वाढली असल्याचे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
ते राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे सातारा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ टेंभू ता.कराड येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
याप्रसंगी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे अधिकृत उमेदवार श्रीनीवास पाटील, गोपाळराव धोकटे, चंद्रकांत कदम, रामदास पवार, दादासो जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांमध्ये भाजप सेनेचे सरकार हे सातत्याने एकमेकांच्या विरोधात भूमिका घेत होते परंतु निवडणुकीच्या तोंडावर सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र येऊन भावनिक प्रश्न निर्माण करून जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचं काम युती सारकांरने केले.त्यामुळे इथून पुढे शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जपण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन यावेळी उपस्थितांना केले.
श्रीनिवास पाटील म्हणाले की, आदरणीय शरद पवारसाहेबांच्या नेतृवाखाली सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या उमेदवारांनी पक्ष का सोडला याच उत्तर सर्वसामान्य जनतेला द्यावे.जिल्ह्याच्या विकासासाठी पक्ष सोडल्याचे कारण सांगत आहेत तर मग गेल्या दहा वर्षात विकासकामसाठीचा निधी का माघारी घालवला असा टोला श्रीनिवास पाटील यांनी लगावला.
याप्रसंगी तुकाराम खोचरे, कुमार पवार, पै.सतीश डांगे, अधिक सुर्वे, दिगंबर डांगे, हणमंत शेवाळे, शिवलिंग जंगम, चंद्रकांत भुसारी, बाबुवाहन पाटील, प्रताप सावंत, बाळासो पाटील, विनायक कदम, भीमराव पाटील, सयाजीराव पाटील, सुनील बाबर, संभाजी पाटील, शिवाजी पाटील, भास्कर पाटील, मोहन बाबर, राहुल पाटील, राजाराम बाबर, सदाशिव इंगवले, सुरज मुल्ला, विक्रम कदम, अभिजीत महाडिक, पंकज पाटील, शेखर हुलवान, शुभम कांबळे तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |