05:27pm | Mar 12, 2019 |
सातारा : माढा मतदारसंघाचा तिढा वाढतच चाललेला आहे. काल शरद पवारांनी माढ्यातून लढण्यास असमर्थता दाखविल्यानंतर माढ्यातून कोण? याची चर्चा कालपासूनच सुरु होती. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील शरद पवारांच्या उमेदवारीनंतर नाराज होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही विजयदादांचे पुनर्वसन करा, अशी मागणी पवारांकडे केली होती. मात्र काल पवारांनी लढणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर काल संध्याकाळीच भाजपने विजयसिंह मोहिते-पाटलांचे चिरंजिव रणजितसिंहांना गळाला लावले आहे. आज दुपारी रणजितसिंह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
सध्या महाराष्ट्रातील माढा आणि नगर लोकसभेचा गुंता वाढलेला आहे. नगरमधून कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील भाजपची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील यांना भाजपने गळाला लावले आहे. काल रात्रीच मोहिते-पाटील व मुख्यमंत्र्यांमध्ये खलबते झाली आहेत. शरद पवारांनी पुन्हा एकदा माढ्यातून लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मोहिते-पाटील गट नाराज झाला होता. पवारसाहेब जर माढ्यातून लढणार असतील तर विजयदादांचे पहिले पुनर्वसन करा, अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली होती. नाराज असलेले मोहिते-पाटील संधीच्या शोधात होते. हीच संधी भाजपने साधत थेट रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाच गळाला लावत राष्ट्रवादीला मोठा जोरदार झटका दिलेला आहे. त्यामुळे माढा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी मोठा पेच निर्माण झाला आहे. आज संध्याकाळपर्यंत रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मोहिते पाटील जर भाजपात गेले तर माढा मतदारसंघ कॉंग्रेसला देवून त्या बदल्यात सांगली मतदारसंघ राष्ट्रवादीला पदरात पाडून घ्यावा लागणार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |