सातारा : फलटण शहर व तालुक्यात दरोडा, चोरी, जबरी चोरी अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया करून उच्छाद मांडणाऱ्या, भरत फडतरे व त्याच्या टोळीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. प्रकाश सावंत यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सातारा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कान्वये कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. फलटण पोलीस उपाधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी भरत फडतरे टोळीवर मोक्क्याचा अहवाल पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दि. १६ सप्टेबर रोजी प्रस्तावास मान्यता दिली. त्यानुसार आज भरत लक्ष्मण फडतरे रा. मलठण ता. फलटण, विजय दत्तू ननवरे रा. आखरीरस्ता, वडर गल्ली, मंगळवार पेठ फलटण, स्वप्निल गुलाब जावळे रा. बोरी ता. खंडाळा यांच्यावर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे.
भरत फडतरे याच्यावर फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. तर विजय दत्तू ननवरे याच्यावर फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. स्वप्निल गुलाब जावळे याच्यावर फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी, असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील फडतरे व ननावरे हे वेगवेगळ्या गुन्ह्यात सातारा येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. तर स्वप्नील जावळे हा नुकताच जामिनावर सुटला असल्याची माहिती पो.नि. सावंत यांनी दिली आहे.
भरत फडतरे टोळीवर फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे, फलटण पोलीस उपाधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सावंत यांनी याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार आज भरत फडतरे व त्याच्या दोन साथीदारांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |