RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

कराड बस स्टँडवर पिस्तुलासह एकास अटक

11 October 2018 at 14:47

सातारा : कराड बसस्थानक परिसरातून सागर सदाशिव नलावडे (वय २०, रा. देशमुखमळा, पार्ले ता. कराड) या युवकाकडून स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने पिस्तुल जप्त केले. बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी, कराड परिसरात एक युवक बेकायदा पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. कराड स्टँड परिसरात पोलिस गस्त घालत असताना एक युवक संशयितरीत्या फिरत होता. एलसीबीच्या पथकाने त्याला हटकताच तो पळून जाऊ लागला. एलसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्याच्याकडे पिस्टल सापडले.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी त्याला नाव विचारल्यावर त्याने सागर नलावडे असे नाव सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व पिस्टल जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताला कराड पोलिस ठाण्यात नेऊन त्याच्याविरुद्ध आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. या कारवाईनंतर संशयित युवकाकडे पोलिस रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी करत होते.

 

मतमोजणीच्या पूर्वसंध्येला सातार्‍यात पोलिसांचे महासंचलन

उद्या होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर आज संध्याकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सातार्‍यातील मुख्य मार्गांवर हजारो पोलिसांनी महासंचलन केले. सातारा जिल्ह्यात मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था

20 hours before

सातार्‍यात आणि माढ्यात भूमिपुत्रांचाच डंका ?

तारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे श्री. छ. उदयनराजे भोसले हॅट्रीक करणार? की, माढा लोकसभा मतदारसंघातून फलटणचे भूमिपुत्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपचे कमळ फुलवणार?

20 hours before

श्री संतकृपा इंजिनिअरींगचा पुणे येथील विविध कंपन्यांशी सामजस्य करार

घोगांव ता.कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (बी टेक) या महाविद्यालया मध्ये प्रवेश घेऊन बाहेर पडणार्‍या अभियंत्यांसाठी संस्था विविध संकल्पना राबवत असते.

22 hours before

आ.बाळासाहेब पाटील यांची पाडळी येथील पारायण सोहळ्यास सदिच्छा भेट

गांवोगांवी होणार्‍या पारायण सोहळयांमुळे सात्वीक विचार व आचारांचा प्रचार होवून, सुसंस्कारीक युवा पिढी घडविण्यास मदत होत असून, 13 व्या शतकातील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या नामस्मरणाचा जप आजही तितक्याच भक्तिभावाने पारायण सोहळे, अखंड हरिनाम

22 hours before