सातारा: सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आनंद भंडारी यांच्यावर झालेल्या आरोपांची जबाबदारी प्रशासनप्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी घेऊन चौकशी करावी. तसेच पिडीत महिलेला योग्य न्याय द्यावा, अन्यथा शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव व नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
जाधव म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण, क्रांतीसिंह नाना पाटील यांचा वारसा असलेल्या सातारा जिल्ह्याचा देशात नावलौकीक आहे. त्याच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एखाद्या अधिकार्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होतो हा अशोभनीय प्रकार आहे. जिल्हा परिषदेत कोणत्याही चांगल्या वा वाईट गोष्टीची जबाबदारी ही प्रशासन प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. या प्रकरणात नि: पक्षपाती पणे राहून निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी परिपत्रक काढून योग्य निर्णय घ्या, अन्यथा शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
जिल्ह्यामध्ये शिवसेना हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. या घटनेमुळे जिल्हा परिषदेत काम करणार्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पुढे असे काही घडल्यास अधिकार्यांची नसबंदी करावी लागेल, असा इशारा दिला. पिडीत महिलेवर अन्याय झाल्यानंतर तिने आमच्याशी संपर्क साधला होता. त्यासाठी आम्ही चार महिने या प्रकरणाचा पाठपुरवा केला होता. भंडारी हे आमचे शत्रू नाहीत. त्या महिलेला न्याय देण्यासाठी शिवसेना कायम तत्पर राहिल. पाटील म्हणाले, सातारा जिल्हा देशात आघाडीवर राहिला आहे. मात्र, सध्याचे अधिकारी हे जबाबदारी ओळखून काम करत नाहीत. तक्रार झाल्यानंतर यवतमाळ येथे बदली झालेल्या एका अधिकार्याने या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. जि.प अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी या प्रकरणात भूमिका जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र, ते भूमिका घेतील असे वाटत नाही त्यांनीच आतापर्यंत आनंद भंडारी यांना पाठीशी घातलेले आहे.
त्यामुळे शिवसेनेचे संस्कार असलेल्या आणि राष्ट्रवादीतून जि.प उपाध्यक्ष झालेल्या वसंतराव मानकुमरे यांनी भूमिका जाहीर करावी. त्यांच्या सेनेचे संस्कार असल्याने एखाद्या महिलेवर अन्याय होत असल्याचे पहावणार नाही त्यामुळे ते निश्चित भूमिका जाहीर करतील. तसेच डॉ. कैलास शिंदे यांनी लक्ष घालून जिल्हा परिषदेत काम करणार्या महिलांना सुरक्षिततेची हमी द्यावी. तसेच नेत्यांचा जिल्हा परिषदेवर वचक नसल्याने असे प्रकार होत असल्याची टीका केली.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |