04:44pm | Aug 18, 2018 |
सातारा : फलटणमधील अवैध खासगी सावकारी खरेतर पीएचडी च्या संशोधनाचा विषय होईल, त्याच्यावर अनेक चित्रपटही तयार होतील. एवढा उच्छाद फलटण तालुक्यातील अवैध खासगी सावकारांनी घातलेला आहे. त्याला फलटणमधील राजकीय पुढार्यांनी पाठबळ दिल्यामुळेच फलटणमधील अवैध खासगी सावकार माजलेले आहेत. आज त्यांनी फलटणमधील एका उमद्या तरुणाचा बळी घेतला. गेली तीन दशके फलटणमधील अवैध खासगी सावकारीचे भूत फलटणकरांच्या मानगुटीवर बसलेले आहे. या भुताला पायाखाली लोळवून तुडविण्याची वेळ आता आलेली आहे. आता नाही, तर कधीच नाही अशी वेळ आलेली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी फलटणमधील बर्याच अवैध खासगी सावकारांना मोक्का खाली अटक करुन जेलचे वासे मोजायला लावले आहेत. परंतू फलटणमधील राजकीय पुढार्यांच्या वळचणीला बसलेले अनेक नग नूतन पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी गचांडीला पकडून बाहेर काढावेत, अशी अपेक्षा फलटणकर करीत आहेत.
गेली तीन दशके फलटणमधील सोमवार पेठेतील अवैध खासगी सावकार फलटणकरांना नाडत आहेत. स्थावर जंगम मिळकती गिळंकृत करुनसुद्धा या खासगी सावकारांची भूक भागली नाही, म्हणूनच की काय त्यांनी फलटणमधील आया-बहिणींच्या अंगावर हात टाकण्यास कमी केले नाही. फलटणमधील एक-एक खासगी सावकार आज शंभर कोटींच्या घरात आहे. एखादा माणूस आयुष्यभर नोकरी करुन सेवानिवृत्त झाल्यानंतर घर बांधण्या इतपतही त्याकडे पैसे उरत नाहीत. परंतू फलटणमधील अनेक अवैध खासगी सावकारांनी अल्पावधीतच टोलेजंग इमले बांधले. कोट्यवधी रुपयांच्या मिळकती अस्तित्वात आणल्या. या कशा आणल्या, हे फलटणमधील शेंबडे पोरही सांगू शकेल. एवढा उतमात आणि उन्माद फलटणमधील या खासगी सावकारांनी घातलेला आहे. 1995 नंतर फलटण नरेशांची फलटणच्या राजकारणात एन्ट्री झाली. या फलटण नरेशांनीच आपले लयास गेलेले व कफल्लक झालेले संस्थान वाढविण्यासाठी या अवैध खासगी सावकार व गुंडापूंडांचा आधार घेत फलटणमध्ये राजकारण केले. फलटणमधील राजकीय पुढार्यांच्या महत्त्वकांक्षेमुळेच अवैध खासगी सावकारीची विषवल्ली वाढत गेली आहे. अनेक खासगी सावकार राजकारणात शिरुन ‘व्हाईट कॉलर’ झाले आहेत. ‘तो मी नव्हेच’ अशा अविर्भावात ते फलटणमधून फलटण नरेशांच्या गाडीतून फिरत असताना दिसतात.
सुमारे तीन वर्षापासून ‘सातारा टुडे’ने फलटणच्या खासगी सावकारी विरोधात ‘एल्गार’ पुकारलेला आहे. तत्कालीन पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी फलटणमधील अवैध खासगी सावकारीचा बिमोड करण्यासाठी आश्वासक पावले उचलून अनेकांवर कारवाई केली. परंतू फलटणमधील राजकीय पुढार्यांनी विशेषत: फलटण नरेशांनी बड्या खासगी सावकारांना वाचविण्याचा थेट विधानभवनातून प्रयत्न केला. फलटणमधील अनेक तळाला लपलेले ‘बडे मासे’ फलटण नरेशांच्या ‘बॅकिंग’मुळे समाजात ताठ मानेने वावरत आहेत. मध्यंतरी फलटण येथील फटाका व्यवसायिक नितीन चांडक यांचे व्याजाच्या पैशासाठी अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत नितीन चांडक गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी फलटण शहर पोलिसांनी त्यांची साधी दखलसुद्धा घेतली नव्हती. जिवाच्या भीतीने चांडक हे सातारा येथील शासकीय रुग्णालयात स्वत:हून दाखल झाले होते. ‘सातारा टुडे’ने या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या बातमीची गंभीर दखल घेवून मारहाण व अपहरण करणारा अवैध खासगी सावकार युवराज पवार-पाटील याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच युवराज पवार-पाटील व इतर आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची तयारीही चालविली होती. मात्र, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची बदली झाल्यामुळे ही कारवाई अद्याप रखडलेली आहे. नूतन पोलीस प्रमुखांसमोर संदीप पाटील यांचे राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी येवून पडली आहे.
फलटणमधील अनेक अवैध खासगी सावकारांनी पैशांच्या जोरावर स्वत:ची कातडी वाचविलेली आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यात आलेल अनेक अर्ज टेबलाखाली ‘सेटलमेंट’ करुन डस्टबीनमध्ये टाकले जातात. त्यामुळे अनेक सावकारांचे आतापर्यंत फावले आहे. फलटणमधील सोमवार पेठ येथील अनेक सावकार फलटण नरेशांच्या पाठबळामुळे निर्धास्त आहेत. सद्गुरु यांच्या नावाखाली अनेक नटांनी आपले काळे धंदे लपवलेले आहेत. परंतू ‘भगवान के घर देर है, लेकीन अंधेर नही’ या प्रमाणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना या तळाला लपलेल्या माशांना गळाला लावावे लागणार आहे. तरच फलटणमधील अवैध खासगी सावकारीची विषवल्ली ठेचली जाणार आहे. थातुरमातूर सावकारांवर कारवाई करुन काही हाशील होणार नाही. प्रसंगी फलटणमधील अवैध खासगी सावकारांना पाठिशी घालणार्या व्हाईट कॉलर पुढार्यांनाही ठेचून काढण्याची वेळ आता आलेली आहे.
सेटलमेंटच्या दुकानामुळेच विनोदचा बळी गेला काय?
‘सातारा टुडे’ने प्रथमपासून फलटणमधील अवैध सावकारी ठेचण्यासाठी रणशिंग फुंकलेले आहे. यामुळे अनेक अवैध खासगी सावकारांना जेलची हवा खावी लागली होती. फलटणमधील राजकीय पुढार्यांचे अनेक बगलबच्चे यानिमित्ताने ‘आत’ बसले. त्यामुळे फलटण नरेशांसह अनेकांची तंतरली होती. उपरती झाली म्हणून, की सेटलमेंटसाठी? धाकल्या फलटण नरेशांनी फलटणमधील मार्केट यार्डात अवैध खासगी सावकारी निर्मूलन करण्यासाठी सेटलमेंटचे दुकान थाटले होते. तक्रारदाराचे रडून ऐकायचे व पाठिमागे संबंधित सावकाराकडून लाखोंची तोड करायची, असा उद्योग येथे सुरु होता. परंतू ‘सातारा टुडे’ने या दुकानाबद्दल वृत्त प्रकाशित केल्यानंतर या धाकल्या नरेशांचा जळफळाट झाला. त्यानंतर ‘आधीच फाटली आहे, अजून फाटायला नको’ म्हणून हे सेटलमेंटचे दुकान बंद करण्यात आले. आज फलटण तालुक्यातील होळ गावच्या उप सरपंचाने अवैध खासगी सावकारांच्या त्रासामुळे गळफास घेवून आत्महत्त्या केली. त्याच उप सरपंच असलेल्या विनोद भोसले यांनी या सेटलमेंटच्या दुकानात अनेकदा चकरा मारल्याची चर्चा होती. कदाचित त्यावेळी सेटलमेंट झाली नसती, तर आज विनोद भोसले यांचा जीव वाचला असता.
-संग्राम निकाळजे
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |