10:20pm | May 19, 2018 |
सातारा : पाटेश्वर देवस्थान क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच पंचक्रोशीचा सर्वांगिक विकासास साधणेसाठी आम्ही कटीबध्द आहोत. विकास कामामध्ये कोणताही अपपरभाव आमच्या कडून कधीही केला गेलेला नाही व येथुन पुढेही होणार नाही. राजकारणापेक्षा समाजकारणाला आम्ही महत्व देत आलो आहोत, त्यामुळे विकास कामे सांगत जावा, ती आमच्याकडून पूर्ण करण्याचे सर्व प्रयत्न केले जातील अशी ग्वाही देतानाच, सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देगांव येथे बेलाचे वन उभारण्याच्या सूचना त्यांनी वनविभागला दिल्या.
देगाव पाझर तलाव गळतीचे काम जलयुक्त शिवार अभियान अंतर्ग जिल्हा परिषद यांत्रिकी विभागाच्या माध्यमांतून गेले एक महिनाभर चालू आहे, आज ते काम पुर्णत्वास गेले त्याचा लोकार्पण सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी जि,प, सदस्या सौ.अर्चनाताई देशमुख,पंचायत समिती सदस्या सौ.रेखाताई शिंदे, जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, देगावचे सरपंच गणेश रोकडे देगाव विकास आघाडीचे नेते मा.जि.प.सदस्य श्री.दत्तात्रय शिंदे, श्री.संग्राम बर्ग, मा.उपसरपंच श्री.विकास पवार, आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी देगांवचे सरपंच गणेश रोकडे यांनी तसेच जिल्हा परिषदेच्या सदस्या अर्चनाताई देशमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगीतले की, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने आणि त्यांनी कार्यतत्परतेने धडाडीने निर्णय घेतल्याने, अनेक वर्षे प्रलंबीत असलेल्या देगांवच्या पाझर तलाव दुरुस्तीचे काम मार्गी लागुन पूर्ण झाले आहे.खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सहकार्यामुळेच पाझर तलावाचा प्रश्न मार्गी लागला आहे.देगांव ग्रामस्थांच्या वतीने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आम्ही लाख-लाख धन्यवाद देतो असे विनम्रपणे सांगीतले.
यावेळी पंचायत समिती सदस्या सौ.रेखाताई शिंदे, प.स.सदस्य श्री.रामदास साळुंखे, मा.सरपंच सौ.शोभा साळुंखे, सचिन आप्पा पाटील, श्री.भरत बापू, श्री.जगन्नाथ नाना व जेष्ठ नागरीक व गावांतील प्रमुख प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |