RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

कोरेगाव तालुक्याचे विद्यमान नेतृत्व घरपोच करण्याची वेळ आता आली आहे : सुनील खत्री

09 October 2018 at 03:50

कोरेगाव : आमदारांचे या तालुक्यात रोज नवीन खेळ सुरु आहेत. गावोगावचा निष्ठावान कार्यकर्ता संपवायाचा आणि त्याजागी आपली हुजरेगिरी करणारा कार्यकर्ता तयार करायाचा असे उद्योग कोरेगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्याकडून सध्या सुरू आहेत. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्याला घरपोच करणारे कोरेगाव तालुक्याचे विद्यमान नेतृत्वच घरपोच करण्याची वेळ आता आली आहे, असा घणाघात जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सुनील खत्री यांनी तांदुळवाडी, ता. कोरेगाव येथील सभेत केला. 

सुनील खत्री पुढे म्हणाले, कार्यकर्ता तयार होण्यासाठी किमान 20 वर्षे सार्वजनिक जीवनात समाजकार्य करावे लागते. 9 वर्षापूर्वी घरचा की बाहेरचा असा भेदाभेद न करता आम्ही कोरेगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना स्विकारले. विधान सभेच्या दोन्ही निवडणुकीत कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदारांचे प्रामाणिकपणे काम करणार्‍या पक्ष कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांची विकासाची स्वप्ने धुळीला मिळाली आहेत. 

विद्यमान आमदारांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव तालुक्यात मतदार संघातील महिलांची मोफत आरोग्य तपासणी सुरू आहे. यामध्ये कॅन्सर, रक्तशर्करा, कॅल्शियम, थायराईड, हिमोग्लोबीन आदी मोफत तपासण्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुरू आहेत. गेल्या नऊ वर्षात मतदार संघातील महिलांच्या आरोग्याची तपासणी का झाली नाही? त्यावेळी महिलांना आजार नव्हते का? संभाव्य निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवरच मतदार संघात महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी सुरू झाल्या आहेत. महिलांच्या आरोग्य तपासण्या करताना कोरेगाव तालुक्यातील निष्ठावान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्याही आरोग्य तपासण्या विद्यमान आमदारांनी कराव्यात. लोकप्रतिनिधींच्या लहरी वागण्यामुळेच कोरेगाव मतदार संघातील कार्यकर्ता कुपोषित राहिला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांचे शोषण विद्यमान आमदारांनी वेळोवेळी केले आहे, अशी टिका सुनील खत्री यांनी आ. शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता केली. 

खा. उदयनराजे भोसले यांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यांच्या पाठिंब्यावर स्वाभिमानी विचार मंचची वाटचाल नव्या दमाने पुढे सुरू ठेवायाची आहे. कोरेगाव तालुक्यात एमआयडीसी नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. मेडिकल, इंजिनिअरींग कॉलेजसह इतर विविध शिक्षणाच्या सुविधा नाहीत. दुष्काळी भागाच्या शेतीला कायमस्वरुपी पाणी नाही. लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे कोरेगाव, खटाव या दुष्काळी तालुक्याच्या वसना, वांगना, जिहे-कठापूर उपसासिंचन योजना रखडल्या आहेत. सर्व आघाड्यावर निराशा दिसून येत आहे. कोरेगाव तालुका कोरा ठेवण्याचे काम विद्यमान नेतृत्वाने गेल्या नऊ वर्षात केले आहे. रोजगार नाही, उद्योग नाही, पाणी नाही, भावी पिढयांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. हे चित्र बदलण्यासाठी एकत्रित येऊया. 

पक्षश्रेष्ठींकडे नेतृत्व बदलाची मागणी करू, कोरेगाव मतदार संघातील स्थानिक नेतृत्व दिले नाही तर एकसंधपणे एकत्रित येवू आणि विद्यमान नेतृत्वाच्या विरोधात मोठा संघर्ष उभर करू, असा निर्धार सुनील खत्री, शामराव चव्हाण, वसंत गुरूजी, भरत साळुंखेसह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. तांदुळवाडी, ता. कोरेगाव येथे आयोजित केलेल्या स्वाभिमानी विचार मंचच्या कार्यक्रमास विठ्ठलराव कदम, नारायणराव फाळके, अजयबापू कदम, नाना भिलारे, पोपटराव कर्पे, अ‍ॅड. पी.सी. भोसले, भरत साळुंखे, प्रल्हादराव मतकर, भगवानराव जाधव, अर्जून कदमसह शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते. 


mचौंडेश्वरीनगर व मलकापूर येथील मस्जीदींचे अतिक्रमण हटवा

चौंडेश्वरीनगर गोवारे, व मलकापूर ,ता. कराड येथे सरकारी खुल्या जागेत मस्जीदीचे अनाधिकृतपणे व बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे.

4 hours before

मलटण मध्ये घरफोडी ; साडेसात लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले

येथील उपनगर असलेल्या मलटण येथील काळुबाई नगर येथे बंद घराचे कुलूप तोडून 37 तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत.

4 hours before

बालकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कार चालकास सक्तमजुरी

शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये महामार्ग ओलांडणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी पुणे येथील एका कार चालकाला खंडाळा न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

5 hours before

जमाव व शस्त्रबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी खा. उदयनराजे, आ. शिवेद्रराजेंसह ७५ समर्थकांवर गुन्हे

सोमवारी भरदुपारी दारूच्या दुकानासमोर खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह समर्थकांमध्ये झालेल्या टशन नंतर शाहुपूरी पोलिस ठाण्यात एकूण दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

5 hours before