12:01am | Jun 19, 2019 |
सातारा : जैसी करनी वैसी भरणी या न्यायातुन कोणालाच सुट मिळत नाही, आमदार शिवेंद्रराजे आमचे बंधु असले तरी सुध्दा याला ते अपवाद नाहीत, लोकसभेला आमदार शिवेंद्रराजेंनी आमचे कामच केले असल्याने, आमच्या दिलेल्या शब्दात फरक पडणार नाही, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा-जावली विधानसभा मतदार संघात आमचे पाठबळ राहील. त्या भुमिकेत बदल होणार नाही. तथापि त्यांच्या करणी मुळे जर काही बरे-वाईट घडले तर त्यास सर्वस्वी तेच जबाबदार असतील. रोग रेडयाला आणि इलाज पखालीला असला त्यांचा सुरु असलेला प्रकार त्यांनी बंद करावा. स्वतःच निर्माण केलेल्या बागुलबुवांना स्वतःच निपटावे, आमच्यावर तर नाहीच नाही परंतु दुस-या कोणावरही अगोदरच (प्री-मॅच्युरिटी) खापर फोडू नये असे तडाखेबंद प्रत्युत्तर आज सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिले आहे.
आमदार शिवेंद्रराजे सध्या भलतेच सावध झाल्याचे त्यांच्या विधानांवरुन दिसत आहे. त्यांना सर्वत्र दगाबाजी,दगाफटका-धोका यांचेच चित्रण डोळयासमोर येत आहे असा दाट संशय त्यांच्या एकंदरीत विधानावरुन येत आहे असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की,
लोकसभा निवडणुकीच्या आधीची तुमची वक्तव्ये एकदा तपासून पहा. पवारसाहेबांनी आमदारांना विश्वासात घ्यावे, पवारसाहेब देतील तो उमेदवार मान्य असेल, पवारसाहेबांनी तिकीट दिले तरी उदयनराजेंचे काम करणार नाही, लोकसभेला उदयनराजेंच कामच करणार, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत वगैरे तुमचे उद्गार तुम्ही विसरलेला नसणार, किंवा तुम्ही मिशीवाल्यासोबत खाल्लेल्या चविष्ट मिसळीचा काही दिवसानंतर आता तुम्हाला ठसका लागत असावा. म्हणूनच कदाचित आता आमच्या प्रत्येक हालचालीविषयी तुम्हाला शंका उत्पन्न होत असावी.शंका-संशय घेणे ही तुमची कुजकी सवय आहे किंबहुना तो तुम्हाला वारसा लाभला आहे. तथापि काहीही असले तरी आम्ही दिलेल्या शब्दाला जागणारे आहोत, तुमच्या विधानसभेला आमच्यापासून तरी काडीचाही धोका होणार नाही. उगाच साप समजुन भुई थोपटण्याचा प्रकार टाळला पाहीजे.
परंतु त्याचबरोबर, जावलीत तुम्हीच उभी केलेली भुतं तुमच्या मानगुटीवर बसायला कमी करणार नाहीत याची नोंद गांभिर्यांने घ्या. तुमचा निशाणा, तुमच्याच करणीने निर्माण केलेल्या बागुलबुवांवर ठेवा, रोग रेडयाला झाला आहे आणि तुम्ही इलाज पखालीला करत आहात. तुम्ही जे केले आहे तेच तुम्हाला दसपटीने परत मिळणार आहे याची खुणगाठ पक्की बांधुन, त्यादृष्टीने वाटचाल करा. आपण सातारा जावली विधानसभा मतदार संघातुन मनोमिलनानंतर महाराष्ट्रातुन दोन नंबरने निवडुन आला होता. एक नंबरला अशोक चव्हाण आणि तीन नंबरला अजित पवार हे होते. इतके लिड स्व.भाउसाहेब महाराजा यांचे पासून, कोणालाही मिळालेले नाही हे विसरलात का ?
तसेच तुमचा आणि भगीरथ उर्फ भोगीरथाचा दूरवर कसला संबंध आहे का नाही हे सर्वांना माहीती आहे, उगाच विश्वामित्री पवित्रा घेवू नका. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही जाहिर सभेत आपणासह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी चांगले सहकार्य केले आहे असे जाहिरपणे नमुद कले आहे. काही दिवसांनी कथित भगिरथ उर्फ भोगीरथ मात्र उदयनराजेना जावलीत कमी मते मिळाली ते पहा असा अगांतुक सल्ला देतो,. आपण तर म्हणता की सातारा जावली मध्ये मिळालेले मताधिक्य तुम्ही पक्षाशी प्रामाणिक राहुन काम केल्याने मिळाले आहे,. यावरुन तुमच्या बाबतीत संभ्रम कोण निर्माण करते आहे हे एकदा शांतपणे विचार करुन ठरवा. जैसी करनी वैसी भरनी हा न्याय सर्वांनाच लागु आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.
आमदार शिवेंद्रराजें यांनी,आमदार शशिकांत शिंदे, ॠषीकांत शिंदे आणि उदयनराजे असे तीघे मिळुन डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार केली आहे. त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचेही नाव घेतले आहे, तुम्हाला उपद्रव करण्यासाठी, आमची कसली बैठक,मिटींग,कोठे झाली आहे का ? याचा खुलासा आमदार शशिकांत शिंदे यांनी करणे गरजेचे आहे तसेच आमदार शिवेंद्रराजें यांनीही आमदार शशिकांत शिंंदे यांना याबाबत त्यांना विचारणा केली पाहीजे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |