11:28pm | Sep 02, 2018 |
कराड : रेठरे बुद्रुक, ता. कराड येथे चिकुन गुनियाची साथ असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर करत त्या अनुषंगाने सर्व त्या उपाय योजना हाती घेतल्या आहेत. साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. तोच येथील सहा रूग्णांना डेंग्यू सदृश्य साथीच्या आजारांची लक्षणे दिसून आली आहेत. त्यांच्या रक्तातील प्लेट लेटस् कमी होत असल्याचे दिसून आल्यानंतर आरोग्य विभागाने दक्षतेचे आवाहन केले आहे.
रेठरे बुद्रुकला चिकुन गुनियाच्या साथीचा प्रादुर्भाव झाल्याने येथील घरांचा सव्र्हेकरून प्रथमोउपचारासह जनजागृतीच्या कामाला गती दिली आहे. या सव्र्हेत घरोघरी डासांची अंडी व आळ्या आढळून आल्या आहेत. आरोग्य विभागाने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवलेल्या ११ रक्त नमुन्यांपैकी ४ रक्त नमुने पॉझिटीव्ह आल्याने रेठरे बुद्रुकला चिकुन गुनियाची साथ असल्याचे जाहीर केले.
जुलै महिन्यापासून येथील ग्रामस्थ चिकुन गुनिया व डेंग्यू सदृश्य साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. सुरूवातीला कृष्णा हॉस्पिटलकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या ७५ वर्षीय रूग्णाच्या रक्त नमुन्यात चिकुन गुनियासह डेंग्यूची टेस्ट आणि १५ वर्षीय मुलीची डेंग्यू टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. तर आतापर्यंत ११ रूग्णांच्या रक्ताचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले. त्यापैकी चार रूग्णांना चिकुन गुनियाची लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या पार्श्वभुमीवर हिवताप विभागाच्या जिल्हाप्रमुख जंगम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपजिल्हा आरोग्य अधिकारी फाळके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिल कोरबू यांच्यासह हिवतापाचे मच्छर पकडणाऱ्या पथकाने गावाला भेट दिली. गावाची पाहणीकरून डासांची अंडी व आळ्या निर्मुलनाबाबत ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला योग्य त्या सूचना केल्या तसेच ग्रामस्थांना स्वच्छतेचे आवाहन केले. ग्रामपंचायतीने तातडीने विशेष ग्रामसभेचे आयोजित करत सरपंच सुवर्णा कापूरकर, उपसरपंच शिवाजी चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शरद बागडे, ग्रा. पं. सदस्यांसह आरोग्य अधिकारी डॉ. मैथिली मिरजे, डॉ. अनिता कदम आदींनी स्वच्छतेचे आवाहन केले.
मात्र, अद्यापही म्हणावे तेवढा ग्रामस्थांचा प्रतिसाद आरोग्य व ग्रामपंचायत विभागास मिळत नाही. त्यामुळे ही साथ बाळवण्याचा धोका वाढला आहे. सांधेदुखी, ताप आदींचा त्रास होणाऱ्या रूग्णांमध्ये वाढच होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या सर्व्हेमध्ये सहा रूग्णांना डेंग्यू सदृश्य साथीच्या आजाराचा प्रार्दुभाव झाल्याचे समोर आले आहे. संबंधित रूग्णांच्या रक्तातील प्लेट लेटस् कमी होत असल्याचे आढळून आल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
उद्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक
रेठरे बुद्रक व तांबवे या प्रा.आ. केंद्र असलेल्या गावांमध्येच चिकून गुनिया व डेंग्यू साथीच्या आजाराचे रूग्ण आढळून आले आहेत. या पार्श्चभूमीवर पंचायत समितीमध्ये सभापती फरिदा इनामदार, उपसभापती सुहास बोराटे, गटविकास अधिकारी आबासो पवार यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व प्रा.आ. केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक सोमवार, दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता आयोजित केली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कोरबू यांनी दिली.
ग्रामस्थांच्या सहकार्याची गरज
रेठरे बुद्रुक गावात चिकुन गुनियाची साथ असून डेंग्यू सदृश्य रूग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी परिसरासह घरांतील स्वच्छता हे प्रमुख औषध आहे. यासाठी आरोग्य विभागास ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. त्यांच्या प्रयत्नाला ग्रामस्थांच्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- डॉ. मैथिली मिरजे, आरोग्य अधिकारी, रेठरेबुद्रुक
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |