10:08pm | Jun 12, 2018 |
वाठार स्टेशन : अधिक माहिती अशी की,गेट न.४५ व ४६ बंद करण्याच्या हेतूने दोन्ही गेटच्या मध्यावर रेल्वेने एक भुयारी मार्ग तयार केला आहे.हा भुयारी मार्ग तयार करत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याकडे कोणतीही विचारपूस रेल्वे प्रशासनाने केली नाही.ही दोन्ही रेल्वे गेट बंद करत असताना हा पंढरपूर - पोलादपूर महामार्ग मंजूर झालेला आहे याचा देखील विसर रेल्वे प्रशासनाला पडल्याचा दिसत आहे.या छोट्याशा भुयारी मार्गामधून ही महामार्गावरील वाहतूक कशी काय होणार हा देखील प्रश्न वाठार स्टेशन पंचक्रोशीला पडलेला आहे.
वेळोवेळी रेल्वे प्रशासन आणि वाठार स्टेशन ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय बैठका घेण्यात आल्या यामध्ये ३० मार्च २०१८ रोजी तत्कालीन स.पो.नि.मयूर वैरागकर यांनी पोलीस ठाण्यात तहसीलदार स्मिता पवार,प्रांताधिकारी कीर्ती नलवडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अहिरे साहेब व वाठार स्टेशन पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय बैठक सकारात्मकरीत्या पार पडली व रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेऊन पूर्तता करण्याचेही जिल्हा प्रशासनापुढे मान्य केले. १० एप्रिल २०१८ रोजी पत्रकार मुकुंदराज काकडे यांनी सदरच्या बैठकीत झालेले विषय व वाठार पंचक्रोशीतील ग्रामस्थांवर रेल्वेकडून होत असलेला अन्याय हा मंडल रेल प्रबंधक पुणे यांचे सचिव वाघोलीकर यांना सविस्तरपणे सांगितला तद्नंतर वाघोलीकर यांनी हा विषय मंडल रेल प्रबंधक मिलिंद देऊसकर यांना सांगून आपणास न्याय दिला जाईल अशी ग्वाही दिली. त्यानंतर २३ एप्रिल २०१८ रोजी पुन्हा एकदा ग्रामपंचायत वाठार स्टेशन येथे रेल्वे अधिकारी व ग्रामस्थ यांच्यामध्ये बैठक पार पडली या वेळी या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे मागण्या लिहून घेऊन यावर या लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायत वाठार स्टेशनला दिले. परंतु या बैठकीनंतर रेल्वे प्रशासनाने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही.
रेल्वे प्रशासनाला दिल्या गेलेल्या मागण्यांची पूर्तता न करताच रेल्वेने सोमवारी अचानक गेट न.४५ च्या मधोमध खडी टाकल्याने वाठार स्टेशन ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. कोणालाही काही वेळ कळले नाही की रेल्वे प्रशासना बरोबर दोन वेळा समन्वय बैठका घेवून सुध्दा रेल्वे प्रशासनाने वाठार स्टेशन ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक गेट न.४५ येथे भुयारी मार्ग बनविण्याच्या हेतूने खडी आणून टाकल्याने वाठार स्टेशन ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात या गेट जवळ सोमवारी सायंकाळी सहा वाजता जमा होऊन रास्ता रोको करण्याच्या पवित्र्यात असताना वाठार स्टेशनचे स.पो.नि.विश्वजीत घोडके येथे हजर होऊन ग्रामस्थांशी चर्चा करून येथे उपस्थित असणारे रेल्वे प्रशासनाने अधिकारी शिंदे यांच्या बरोबर सविस्तरपणे सुवर्णमध्य साधण्यासाठी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात ग्रामस्थ व रेल्वे प्रशासनाचे सिनिअर वर्कर इंजिनिअर शिंदे यांच्यात एक छोटे खाणी बैठक घेतली. वेळोवेळी झालेल्या बैठकांसंदर्भात ग्रामस्थांनी स.पो.नि विश्वजीत घोडके यांना माहिती दिली असता घोडके यांनी तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याशी लगेच दूरध्वनी वरून झालेल्या प्रकारची माहिती दिली असता तहसीलदार यांनी लगेच ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून ही टाकलेली खडी बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश वाठार पोलीस ठाण्याला दिले. तद्नंतर वाठार स्टेशन ग्रामस्थ यांनी नवीनच रुजू झालेले स.पो.नि.विश्वजीत घोडके यांचे आभार मानत आंदोलनाचा पवित्रा मागे घेतला.त्याचप्रमाणे अजून एक समन्वय बैठकीचे आयोजन वरिष्ठ पातळीवर करण्याचे आवाहन स.पो.नि.विश्वजीत घोडके यांनी केले आहे.
रेल्वे बरोबर अनेक वेळा बैठका घेवून सुध्दा रेल्वे अधिकारी हुकूमशाही पध्दतीने आपली वर्तणूक करताना दिसत आहेत रेल्वे प्रशासनाने वाठार स्टेशन ग्रामस्थांचा विचार करून सर्व कामाची पूर्तता करावी.
- नागेशशेठ जाधव. राष्ट्रवादी युवा नेते वाठार स्टेशन.
रेल्वे जर ग्रामस्थांचा विचार करत नसेल तर आम्हाला लोकशाही पध्दतीने आंदोलने करावी लागतील रेल्वे ही वाठार स्टेशन मधून जाते त्यामुळे आम्हीही ग्रामस्थ या नात्याने वेळोवेळी रेल्वेला सहकार्य करतो असेच सहकार्य रेल्वेनेही आम्हाला करावे ही विनंती
- अमोल आवळे रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष वाठार स्टेशन.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |