06:14pm | May 09, 2018 |
सातारा : देशातील निवडणुकीचा ट्रेंड पाहिला तर तो आता बदलाला अनुकूल आहे. पण म्हणून लगेचच कोणाला किती जागा मिळतील या निष्कर्षाप्रत येणे म्हणजे ‘बाजारात तुरी आणि कोण कुणाला मारी’ असे होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लगावला. तसेच साताऱ्याच्या राजकारणावर भाष्य करीत, मी असल्यावर सर्व ठीक होते. माझ्यासमोर उडवलेल्या कॉलर निवडणुका लागल्यावर सरळ होतात असा चिमटा काढत त्यांनी मिश्किलपणे कॉलर उडवून दाखवली.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास आपण पंतप्रधान व्हायला तयार असल्याचे वक्तव्य काल राहुल गांधी यांनी कर्नाटकात पत्रकारांशी बोलताना केले होते. त्याविषयी सातारा येथे पत्रकार परिषदेत खासदार पवार यांना छेडले असता, त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी अलीकडे भेट घेतली, त्यावेळी काय चर्चा झाली याविषयी विचारले असता, महाराष्ट्रात एकत्र काम करण्यासंदर्भात चर्चा झाली. सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, समंजसपणा दाखवला पाहिजे, सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे या अनुषंगाने विचारविनिमय झाल्याचे ते म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येईल असे आतातरी दिसते, असे भाकित त्यांनी केले.
पंतप्रधान ही एक 'इन्स्टिट्यूशन' आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. पण कुत्रा काय, खेचर काय अशी भाषा वापरली जात आहे. पदाच्या प्रतिष्ठेचे महत्व यांना दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. जगात जिथे जिथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर होत होता, त्या त्या ठिकाणी त्यांनी इव्हीएम वापरणे बंद केले आहे. मशिनमुळे गडबड होते अशा लोकांच्या मनात शंका आहेत. लोकशाहीत त्या दूर करणे गरजेचे आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर यासंदर्भात भाजप सोडून अन्य एकत्र येऊन निवडणूक आयोगाशी बोलू, असे त्यांनी सांगितले. २०१४ च्या निवडणुकीवेळी सत्ता येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याला चार वर्षे होऊन गेली, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. विधान परिषदेची लातुर - धाराशिव - बीड जागा लढवण्याचा निर्णय सामुदायिक होता. धनंजय मुंडे यांचा त्यात दोष नाही. आमची जागा परभणीची होती. पण तिथे केवळ एक जिल्हा होता. लातुर - धाराशिव - बीड मतदारसंघाच्या निमित्ताने तीन जिल्ह्यात पक्षवाढीला चांगली संधी असल्याने ही जागा घेण्याचा निर्णय घेतला होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. सातारा जिल्ह्यात खासदार व आमदार यांच्यात पेच आहे. यावर काय उतारा काढणार, या प्रश्नावर,पेचबिच काही नाही. मी असल्यावर सर्व ठीक होते. माझ्यासमोर उडवलेल्या कॉलर निवडणुका लागल्यावर सरळ होतात असा चिमटा साताऱ्याचे दोन्ही राजांचे नाव ने घेता काढत त्यांनी मिश्किलपणे कॉलर उडवून दाखवली.
आता आनंद झालाय, तेव्हा हर्षवायू होईल ! राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता पवार म्हणाले, त्यांच्या जामीनावर सुटकेबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. पण त्यांच्या विरोधातील मूळ केसमधून ते बाहेर येतील, तेव्हा आम्हाला हर्षवायू होईल.
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |