सातारा : वंचित बहुजन आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सहदेव ऐवळे यांच्या प्रचाराची सांगता रविवारी (दि. २१) कराड येथील जनता व्यासपीठावर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेने होणार असल्याची माहिती आघाडीचे जिल्हा प्रमुख समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी वंचित आघाडीचे राज्य उपाध्यक्ष पार्थ पोळके, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे आदी उपस्थित होते. राज्यात शिवसेना - भाजप महायुती व वंचित आघाडी यांच्यातच खरी लढत असून महायुती व महाआघाडी यांच्यातील लढाई लुटुपुटुची आहे, अशी टीका खंडाईत यांनी केली. या देशाचे संविधानच धोक्यात आले आहे. विशेषत: या देशामध्ये सरकार अस्तित्वात असतानाही संविधानाच्या प्रतीचे दहन होते. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी उघडपणे संविधान बदलाची भाषा करतात. याला पायबंद घालण्यास मोदी सरकार अपयशी ठरले आहेच. परंतु अशा प्रवृत्तींना ते पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे ही वंचित बहुजन आघाडीची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सातत्याने वंचित आघाडी भाजपला मदत करत असल्याचे विधान करून जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र स्वत:च्या पक्षातील नेते व आमदार उघडपणे भाजपचे समर्थन करत असल्याने भाजपला कोण मदत करत आहे ते स्पष्ट होत आहे, अशी टीका त्यांनी केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |