सातारा : अल्पवयीन मुलीवर दोनवेळा बलात्कार करून नंतर त्या मुलीला लग्न करतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी प्रशांत एकनाथ घोरपडे (वय 31) याला 7 वर्षाची सक्तमजुरी तर त्या मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी आरोपीची आई शोभा एकनाथ घोरपडे ( वय 52 दोघे रा.पिराचीवाडी) यांना 3 वर्षाची साधी कैदेची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 7 पी. व्ही. घुले यांनी ही शिक्षा दिली असून पीडितेल 5 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचार प्रकरणात अशी शिक्षा लागल्याने त्याबाबत समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अल्पवयीन मुलीवर दि. 19 व 25 जून 2011 रोजी प्रशांत घोरपडे याने जबरदस्तीने बलात्कार केला होता. बलात्काराची माहिती दिल्यास तिच्या लहान जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. यामुळे अल्पवयीन कमालीची घाबरलेली होती. सुमारे पाच महिन्यानंतर मात्र मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. पिडीत मुलीचे कुटुंबिय सर्वसामन्य असून मुलीचे आई, वडील रोजगारीने काम करत आहेत. कुटुबियांनी मुलीला विश्वासात घेवून त्याबाबत चौकशी केल्यानंतर प्रशांतचे नाव सांगितले. पिडीत कुटुंबियांनी मुलासह त्याच्या कुटुंबाला जाब विचारल्यानंतर प्रशांतनेही गैरकृत्य केल्याची कबुली दिली.
दोन्ही कुटुंबाची बैठक झाल्यानंतर प्रशांत याने त्या मुलीशी लग्न करतो आता तो गर्भपात करा असे लेखी लिहून दिले. गर्भवती मुलीचा गर्भपात करण्यासाठी शोभा घोरपडे यांनी तगादा लावल्याने व नंतर लग्न करतो असे लिहून दिल्याने त्या मुलीचा गर्भपात करण्यात आला. काही महिने गेल्यानंतर मुलगी सज्ञान झाल्यानंतर लग्नाबाबत विारले असता मुलाने विवाहासाठी नकार दिला. अखेर त्या पिडीत कुटुंबियांनी वाई पोलिस ठाण्यात धाव घेवून 23 डिसेंबर 2011 रोजी तक्रार दिली.पोलिस ठाणत गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनि श्रीकांत डोंगरे-पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
जिल्हा न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर सरकार पक्षच्यावतीने अॅड. मंजुषा तळवलकर यांनी युक्तिवाद केला. सुरुवातीला हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधिश 2 वर्षा मोहिते यांच्याकडे होते. मात्र त्यांची बदली झाल्याने पुढे हे प्रकरण न्या.पी.व्ही.घुले यांच्यासमोर आले. बचाव व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी आई व मुलाला शिक्षा सुनावली.
दरम्यान, प्रशांत घोरपडे हा उच्चशिक्षित युवक असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सांयकाळी उशीरा न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर पिडीत कुटुंबाने न्यायव्यवस्था, पोलीस, वकील या सर्वांचे आभार मानले आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |