05:48pm | Apr 28, 2018 |
फलटण : देशातील लोकसंख्या जसजशी वाढत चालली आहे, तसतशी दळणवळणाच्या साधनांची संख्याही वाढत चालली आहे. या वाहनांमध्ये इंधन टाकणे गरजेचे असल्यामुळे देशभरात पेट्रोलपंपांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. सरकारी आणि खाजगी पेट्रोल कंपन्यांनी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोक्याच्या ठिकाणी पेट्रोलपंप थाटले आहेत. परंतू काही पेट्रोलपंप चालकांकडून अधिक पैसे कमविण्यासाठी पंपाच्या मशिनमधील इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये फेरफार करुन ‘काटामारी’ केली जात असल्याचे फलटण तालुक्यामध्ये निदर्शनास येत आहे.
फलटण तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. पूर्वी फलटण शहरात फक्त दोनच पेट्रोलपंप होते. तालुक्यातील लोक या पंपांवर इंधन भरण्यासाठी येत असत. मात्र जसजशी वाहनांची संख्या वाढली, तसतसे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पेट्रोलपंपही झाले. सातारा, लोणंद आणि पंढरपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पेट्रोलपंप सुरु झाले आहेत. रोज या पंपावर हजारो लिटर इंधन वाहनांमध्ये भरले जाते. मात्र काही पंपचालक अधिक पैशाच्या हव्यासापोटी पेट्रोलपंपावरील कामगारांच्या माध्यमातून इंधन भरतेवेळी काटामारी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्यावर्षी मुंबई उपनगरे, ठाणे तसेच नाशिक परिसरामध्ये पेट्रोलपंपाच्या मशिनमधील इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये फेरफार करुन ‘काटामारी’ केली जात असल्याचे निदर्शनास आले होते. यावेळी पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी अशा पेट्रोलपंपांवर ‘सरप्राईज’ धाडी मारुन असे पंप सील केले होते. फलटण तालुक्यातील पंप हे फलटणमधील राजकीय पुढार्यांच्या मालकीचे असल्यामुळे अनेकठिकाणी पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाला फसवणूक झालेली आहे, हे लक्षात येवूनसुद्धा ग्राहकांना ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करावा लागतो. सातारा-लोणंद रस्त्यावर अशाच एका राजकीय पुढार्याचा पेट्रोलपंप आहे. या पेट्रोलपंपावर दिवसाढवळ्या इंधन भेसळ केली जाते. याबाबतचा व्हिडिओही सोशल मिडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. परंतू राजकीय पाठबळ असल्यामुळे हे प्रकरणही त्यावेळी दाबण्यात आले होते.
सध्या दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये इंधन भरल्यानंतर त्याबाबतची माहिती गाडीच्या डॅशबोर्डवर असलेल्या स्क्रीनवर मिळत असते. रिझर्व्ह लागल्यानंतर आपली गाडी किती किलोमीटर धावणार आहे, याबाबतचे ज्ञान त्या वाहनचालकाला असते. उदा. एखादी गाडी 20 किमी चे एव्हरेज देत असेल आणि त्याच्यामध्ये 5 लिटर डिझेल/पेट्रोल टाकल्यास ती गाडी 100 किमी चालणार, हे गृहित धरले जाते. परंतू फलटणमधील पेट्रोलपंपांवर डिझेल/पेट्रोल टाकल्यास ती गाडी फक्त 50 किमी च चालते. त्यामुळे या पंपांवर मोठ्या प्रमाणावर काटामारी व भेसळ होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरासरी हिशोब केल्यास फलटणकरांना दरमहा सुमारे कोट्यवधी रुपयांचा चुना हे पेट्रोलपंप चालक लावित आहेत, असेच दिसून येते. ठाणे आणि मुंबईच्या धर्तीवरही पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी फलटणच्याही पेट्रोलपंपांवर ‘सरप्राईज’ धाडी माराव्यात. त्यामुळे अशा काटामारी आणि भेसळ करणार्या पेट्रोलपंपांवर कारवाई करुन ते पंप सील करण्यात यावेत, अशी मागणी फलटण तालुक्यातून होवू लागली आहे.
नियमानुसार प्रत्येक पेट्रोलपंपांवर महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, गाडीसाठी हवा उपलब्ध असणे गरजेचे आहे. परंतू पेट्रोलपंप चालकांकडून या प्रकारच्या कोणत्याही मुलभूत सुविधा देण्यात येत नाहीत. अनेक पेट्रोलपंप चालकांनी पंपाच्या आवारात खाजगी पंक्चरवाले ठेवलेले आहेत. वाहनाच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी असे पंक्चरवाले पैशाची मागणी करतात. वास्तविक पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनांच्या टायरमध्ये हवा भरणे नि:शुल्क असतानाही पेट्रोलपंप चालकांकडून ग्राहकांची पिळवणूक केली जात आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |