वाई : पाचगणी महाबळेश्वर येथे सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांची कार दांडेकर थाप्यावरून थेट दरीत कोसळली. सातच्या सुमारास ही घटना घडली असून प्रचंड काळोख असल्याने दारीतील काहीच दिसत नाही. दारीतील एका महिलेचा किंचाळलेला आवाज येत आहे. पाचगणी पोलीस थापावर पोहचले आहेत. महाबळेश्वर ट्रेकर्सला ही बोलवण्यात आले आहे. वाई पोलिस ही कुसगावं मार्गे घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. कार मध्ये पती-पत्नी असून जखमी अवस्थेत पतीला बाहेर काढण्यात टेकर्सला यश आले आहे तर रात्री उशिरापर्यंत महिलेचा शोध सुरू होता.
याविषयी अधिक माहिती अशी की, शनिवार- रविवारच्या सुट्टीनिमित्त पर्यटक पाचगणी महाबळेश्वर फिरण्यासाठी पती-पत्नी लाल रंगाच्या इरटीक कार मधून आले होते. रविवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दांडेकर (पाचगणी) येथील थाप्यावर ते फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान थाप्यावर कारचा वेग नियंत्रणात न आल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार थेट थाप्यावरून सुमारे ४०० ते ५०० फूट खोल दरीत कोसळली.प्रत्यक्षदर्शीनी कार दरीत कोसल्याची माहिती पाचगणी पोलिसांना दिल्यानंतर काहीवेळात पोलिस थाप्यावर पोहचले. मात्र प्रचंड काळोख असल्याने दरातील काहीच दिसत नव्हते. पाचगणी पोलिसांनी दरीत उतरण्यासाठी महाबळेश्वर टेकर्सला बोलवले आहे याबाबतीतची कल्पना वाई पोलिसांना साडेसात वाजता मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक संजय मोतेकर व अन्य पोलिस कर्मचारी कुसगावं मार्गे पायथ्याला पोहचले. मात्र अंधार असल्याने दरीत पोहचण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आठ वाजता महाबळेश्वर टेकर्सला कार चालकाला दरीतून बाहेर काढण्यात यश आले असून त्याला पाचगणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याचे नावं समजू शकले नाही. तो बोलत असून त्याने कार मध्ये पत्नी असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. रात्री उशिरापर्यंत ट्रेकर्सची टीम शोध घेत होती.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |