सातारा : संत वाहणाऱ्या कुडाळी नदीवर महू-हातगेघर या दोन धरणाची निर्मिती झाली. या परिसरातील ग्रामस्थांना विस्थापित व्हावे लागले तर या धरणामुळे कुडाळ भागातील पाण्याचे स्त्रोत कमी झाले आहे. त्यामुळे कुडाळ भागातील ग्रामस्थ, सरपंच यांनी आज साताऱ्यात आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समोर गाऱ्हाणी मांडली.
1995 साली शिवसेना-भाजप युतीच्या काळात सातारा जिल्ह्यातील अनेक पाटबंधारे प्रकल्पाला चालना मिळाली. पाचगणी च्या पायत्याशी असलेल्या महू, हातगेघर ता जावळी येथे धरणाची निर्मिती झाली. महू, वहागाव,रांजणी, हातगेघर,पानस,दापवडी, काटवली,बेलोशी गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांच्या जमिनी पाण्यात गेल्या पण, त्यांच्या पुनर्वसनासाठी कुडाळ भागात कोणीही जागा उपलब्ध करून दिली नाही.सध्या येथील शेतकरी धरणाच्या पाण्यावर यंत्रणा उभी करून शेती करीत आहे.तसेच धरणात पाणी अडवल्याने धरणाच्या खाली असलेल्या कुडाळ भागातील विशेषतः आखाडे, हुमगाव, बामणोली, सोमड्री, शेते, कुडाळ, सर्जापूर परिसरातील विहिरीला तसेच पाणी पुरवठा योजनेवर परिणाम झाला आहे. सद्या कडक उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. याबाबत आज दुपारी जिल्ह्या बँकेत जि प उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे व जेष्ठ नेते हिंदुराव तरडे यांच्या नेतृत्वाखाली आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्यांनी तातडीने जिल्ह्याधिकारी श्वेता सिंघल व वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कुडाळ भागात धरणांचे पाणी सोडण्यात येणार आहे व भार नियमन रद्द करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली.
या बैठकीला सोमड्री सरपंच संतोष शेलार, कुडाळ सरपंच विरेंद्र शिंदे,चंद्रकांत गवळी, पांडुरंग तरडे, चंदू तरडे-इनामदार, राजेंद्र पवार, प्रवीण देशमाने, राहुल कदम, तात्या पवार, विकास धांडे व ग्रामस्थ उपस्थित होते
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |