सातारा : कोपर्डे हवेली, ता. कराड येथे रेल्वे गेटजवळ गावठी पिस्तुल घेवून दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इसमास अन्य एकासह स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी ताब्यात घेतले.
धनंजय मारूती वाटकर (वय-21) विद्यानगर सैदापूर व गणेश उर्फ सनी सुनील शिंदे ओगलेवाडी या आरोपीकडून एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे असा 1 लाख 36 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दि 11 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व त्यांचे पथक गस्त घालत असताना कोपर्डे हवेली येथील रेल्वे गेटच्या पलीकडे एक इसम त्यांना दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरताना आढळला. सदर इसम हा आर्म अॅक्ट मधील आरोपी असल्याचा संशय बळावल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाटकर याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडे गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे रोख रक्कम व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेला गावठी पिस्तुल आपल्या स्वसंरक्षणासाठी ओगलेवाडी येथील मित्राकडून घेतल्याचे वाटकर याने सांगितले तेव्हा शिंदे याला ताब्यात घेण्यात आले. कराड तालुका पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून हवालदार अर्जुन शिरतोडे यांनी ही फिर्याद दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार व त्यांच्या पथकाचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अभिनंदन केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |