सातारा : यशोदा शिक्षण संस्थेमध्ये तळागाळातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम सुरू आहे. मुलांबरोबरच मुलीही शिकल्या पाहिजेत यासाठी यशोदा शिक्षण संस्थेने मुलींसाठी एक नाही तर दोन वसतिगृहे बांधली याचा विद्यार्थीनींना फायदा होईल आणि इरा वसतिगृह हे इतिहासाचे नवे पर्व असेल असे मत वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सी. ए. सी. व्ही. काळे यांनी व्यक्त केले.
यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील इरा वसतिगृह क्रमांक 2 चे उदघाटन काळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे होते. यावेळी वाई अर्बन बँकेचे उपाध्यक्ष आर. के. चावलानी, संचालक विनय जोगळेकर, वाई अर्बन बँकेचे सर्व संचालक, अभिनेत्री स्मिता जयकर, सारंग जगताप, उद्योजक अतुल माळी, टेक्निकल कॅम्पसचे संचालक प्रा. डॉ. एन. जी. नार्वे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. विवेककुमार रेदासाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
काळे म्हणाले, यशोदा शिक्षण संस्थेमध्ये निरपेक्ष वृत्तीने विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम सुरू आहे. संस्थेने ग्रामीण भागीतील मुलीही शिकल्या पाहिजेत यासाठी वसतिगृहाची व्यवस्था केली आहे. पहिले वसतिगृह पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर नव्याने बांधण्यात आलेल्या वसतिगृहातही चांगल्या सुविधा दिल्या आहेत. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलींसाठीच्या नवीन वसतिगृहाचे उदघाटन होत आहे हे महिलांसाठी इतिहासाचे नवे पर्व आहे.
विनय जोगळेकर म्हणाले, यशोदा शिक्षण संस्थेमध्ये देशाचे भवितव्य घडविण्याचे काम सुरू आहे. चांगल्या पायाभूत सुविधा आणि तेवढीच स्वच्छता हे या कॅम्पसचे वैशिष्ट्य आहे. कॅम्पसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड होत आहे त्याबरोबरच आता संशोधनासाठीही प्रयत्न होत आहेत असा वैशिष्ट्यपूर्ण कॅम्पस साता-या सारख्या ठिकाणी असल्याचा आपल्याला अभिमान आहे.
स्मिता जयकर यांनी ज्ञान हे सर्वोत्तम दान असून ते दिल्याने वाढते असे सांगत महिलांनी आपल्यातील शक्ती ओळखावी आणि विविध क्षेत्रात यश मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यशोदा सारख्या संस्थेमध्ये खूप काही शिकता येईल. यासाठी आपले जीवन समृद्ध करणारा अनुभव येथे घ्यावा असेही त्या म्हणाल्या.
संस्थेचे उपाध्यक्ष अजिंक्य सगरे यांनी प्रास्ताविकात संस्थेवरील विश्वासामुळे संस्थेचे काम यशस्वी होत असल्याचे म्हटले. तर विद्यार्थीनींप्रमाणे विद्यार्थ्यांसाठीही वसतिगृह बांधण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले. त्याबरोबरच नॅक आणि दर्जात्मक गुणवत्तेसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
यावेळी यशोदा टेक्निकल कॅम्पस प्रत्येक महिन्याला प्रकाशित करत असलेल्या न्यूज लेटरचे प्रकाशनही पाहुण्यांच्या हस्ते झाले. प्रथम वर्ष इंजिनिअरिंग व फार्मसीमधील गुणवतं विद्यार्थ्यांचा तसेच कॉलेज संपण्यापूर्वीच कॅम्पसच्या माध्यमातून नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी विश्वतेज सेवा संस्थेच्या वेबसाईटचे उदघाटनही अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीएच्या विद्यार्थिनी आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा. आनंद खडके यांनी व्यक्त केले.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |