सातारा : होळ, ता. फलटण येथील उप सरपंच विनोद भोसले यांनी काल रात्री अवैध खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्त्या केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. मृताच्या खिशात सुसाईड नोट सापडल्यानंतर त्रास देणार्या पाच सावकारांची नावे निष्पन्न झाली होती. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी होळ-साखरवाडी परिसरातील ग्रामस्थांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. तसेच आरोपींच्या अटकेशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे अखेर या पाच अवैध खासगी सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण पोलीस स्टेशनवरुन मिळालेल्या माहितीनुसार, मृत विनोद बबन भोसले यांनी (वय 40) यांनी फलटण येथील खासगी सावकार रविराज राजाराम घनवट रा. रामपार्क अपार्टमेंट, जाधववाडी, फलटण आणि बाळू मुकूंदा कोळेकर रा. कोराळे खुर्द, ता. बारामती, जि. पुणे, अनिल चांदुगडे रा. जिंती नाका फलटण, विनोद हणमंत चव्हाण रा. शेरेवाडी ढवळ, ता. फलटण, रविंद्र हरिभाऊ काकडे रा. मंगळवार पेठ, फलटण यांच्याकडून 15 टक्के व्याजाने पैसे घेतले होते. संबंधित सावकारांना मुदलेसह व्याजाची परतफेड केली असतानाही संबंधित सावकारांकडून वारंवार व्याजाच्या पैशासाठी त्रास दिला जात होता. बँकांचे धनादेश, गाडीची कागदपत्रे देवूनही संबंधित सावकार प्रचंड मानसिक छळ करीत असल्याची सुसाईड नोट मृत भोसले यांच्या खिशात सापडलेली होती. या नोटच्या आधारे फलटण ग्रामीण पोलिसांनी पाच सावकारांवर गुन्हा नोंद केला असून यातील काही संशयित आरोपींना अटक केली असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |