04:36pm | Apr 09, 2020 |
सातारा : वॉर्डांमध्ये साफसफाईचे काम सुरू असल्यामुळे नातेवाईक रुग्णाला भेटून न दिल्याने एकाने मोबाईलवर शूटिंग करून वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्याची घटना जिल्हा रुग्णालयात घडल्यामुळे या रुग्णालयाची अवस्था म्हणजे आओ.. जाओ.. घर तुम्हारा ! अशीच झाली असल्याचे दिसून येते.
सातारा जिल्ह्यामध्ये सध्या कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. विलगीकरण कक्षाच्या परिसरासह संपूर्ण जिल्हा रुग्णालयात नियमितपणे साफसफाई, स्वच्छता सकाळच्या वेळी करण्यात येते. हे साफसफाईचे काम सुरू असताना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना भेटू दिले जात नाही. हा पायंडा जिल्हा रुग्णालयात गेले कित्येक वर्षे सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोणत्याही रुग्णाचा नातेवाईकांना अथवा वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांना संसर्ग होऊ नये हाच त्या पाठीमागचा हेतू आहे. सध्या जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये निझरे, ता. जावली येथील संशयित कोरिना बाधित व्यक्तीसह अन्य एकावर उपचार सुरू असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात खबरदारीच्या सर्व त्या काटेकोरपणे उपायोजना करण्यात येत आहेत. राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाचा तसा जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाला सक्त आदेश देण्यात आला आहे.
ही वस्तुस्थिती असताना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी एक युवक दोन दिवसापूर्वी दुचाकीवरून जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्यावेळी जिल्हा रुग्णालयातील साफसफाईचे काम सुरू असल्यामुळे त्याला नातेवाईकांना भेटण्यासाठी मज्जाव करण्यात आला. या गोष्टीचा राग मनात धरुन संबंधित युवकाने मोबाईलवर जिल्हा रुग्णालयातील साफसफाईचे चित्रण करून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्याची धमकी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीतील एका पोलिसाने संबंधित युवकाला जिल्हा रुग्णालयाचे नियम सांगण्याचा प्रयत्न केला असता आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणारच, असा जप त्याने करण्यास सुरुवात केल्यामुळे अखेर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असा पवित्रा शासकीय अधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर मात्र त्या संबंधित युवकाने तेथून निघून जाणे पसंत केले. सध्या जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती पाहता रुग्णालय व परिसरामध्ये अति दक्षता घेण्याची गरज असताना काहीजण मात्र नियम पायदळी तुडवून जिल्हा रुग्णालयाला 'आओ जाओ घर तुम्हारा' समजत असल्यामुळे काही प्रवृत्तींचे चांगलेच फावत आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |