12:33am | Dec 05, 2018 |
कराड : मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवारी दुपारी मुंबईत मंत्रालयात पार पडली. नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी महिला) आरक्षण पडले असून राज्यमंत्र्यांच्या दालनात आरक्षण सोडत झाली. नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीनंतर मलकापुरच्या राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे.
ओबीसी महिला आरक्षणामुळे मातब्बरांच्या दांडय़ा गुल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मलकापूर नगरपंचायतीला उच्च न्यायालयाच्या आदेशाने नगरपरिषद दर्जा मिळाला. क वर्ग नगरपरिषदेची पहिलीच निवडणुक संघर्षाची होणार हे निश्चित असून त्यासाठी राजकीय नेत्यांनी आपली ताकद लावली आहे. प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण जाहिर झाल्यानंतर प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. सक्षम उमेदवार देण्यासाठी मुलाखती व बैठकांचे सत्र सुरू झाल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले. नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय पडते? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. मंगळवारी नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत मुंबईत नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात होती. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी संजीवनी दळवी, ज्ञानदेव साळुंखे हे उपस्थित होते. काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे, नारायण रैनाक, धनराज मनोहर शिंदे यांची उपस्थिती होती. भाजपाचे माजी नगरसेवक हणमंतराव जाधव, हर्षद मोहिते यांनीही हजेरी लावली होती. राज्यमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत चिठ्ठय़ा टाकून आरक्षण सोडत करण्यात आली. मलकापुरच्या नगराध्यक्षपदाची चिठ्ठी काढल्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण असल्याचे समोर आले. नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिला पडल्याने आता निवडणुकीचे संपुर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुक कार्यक्रम कधीही लागणार असला तरी आता राजकीय गटांकडून तयारी सुरू झाली आहे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |