सातारा : सातार्यातील एलबीएस कॉलेजसमोर ट्रॅडिशनल डे सुरु असताना एका अनोळखी युवकाने एकाला चाकूसारख्या धारदार शस्त्राने भोकसले. किरकोळ वादावादी झाल्यानंतर हा हल्ला झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमी युवकावर रुग्णालयात उपचार सुरु असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मानव नवनाथ जाधव (वय 17, रा. राजसपुरा पेठ, सातारा) असे जखमी झालेल्याचे नाव आहेे. याप्रकरणी अज्ञात 10 जणांवर गुन्हा दाखल झाला असून संशयित अंदाजे 19 वर्षाचे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 13 रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता घडली आहे. तक्रारदार मानव जाधव हा ट्रॅडिशनल डे असल्याने एलबीएस कॉलेज समोर थांबलेला होता. त्यावेळी तेथे एकासोबत वादावादी झाली. या वादावादीतून भवानी शाळेच्या गेटच्या बाहेरील बाजूस संशयित 10 जणांच्या टोळक्याने तक्रारदार युवकाला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मानव जाधव याला मारहाण सुरु असतानाच टोळक्यातील संशयित अज्ञाताने तक्रारदार युवकाला खाली वाकवून पाठीत चाकूसारख्या शस्त्राने भोकसले. चाकू हल्ल्यामुळे मानवच्या शरिरातून रक्तस्त्राव होवू लागला. या घटनेनंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला. जखमी अवस्थेत मानव याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तक्रारदाराची तक्रार घेतल्यानंतर गंभीर हल्ल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार सणस करत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |