कराड : येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय, कराड मार्फत (दि.1) जागतिक एड्स दिनानिमित्ताने सोमवारी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आपण बदल घडवू शकतो हा संदेश समाजामध्ये रूजविण्यासाठी या सप्ताहाची सुरवात करण्यात आली.
सदर रॅली उपजिल्हा रुग्णालय कराड येथुन एसटी स्टॅड, बापुजी साळुखे पुतळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा यामार्गाने एचआयव्ही बाबत विविध संदेश देण्यात आला.
रॅलीचे उद्घाटन प्रमुख पाहुणे वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायाधिश ए. पी.कुलकर्णी, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधिश सौ.ए.ए.कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवुन करण्यात आले. सदर कार्यक्रमास स्वर्गीय सौ.वेणुताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रूग्णालय कराडचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रकाश शिंदे यांनी पाहुण्याचे स्वागत केले. तसेच उपस्थितांना एचआयव्ही विरूध्द लढा देण्याचा संदेश दिला. यावेळी आयसीटीसी व एआरटी विभागामधील समुपदेशन, तपासणी व उपचार सुविधांचा लाभ घेण्यासंदर्भात आवाहन केले. न्यायाधिश सौ.ए.ए.कुलकर्णी यांनी शपथ वाचन केले.
कृष्णा नर्सिग स्कूल विद्यार्थिनीनी समाज प्रबोधनपर एड्स या विषयावर पथनाटय सादर केले. कार्यक्रमाचे नियोजन एआरटी विभागाचे नोडल अधिकारी डॉ. शिला खैरमोडे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता यादव, रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शहाजी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास डॉ.मसर्रत आत्तार, पितांबर ठोंबरे, नवनाथ हेंद्रे, प्रतिभा गुरसाळे, प्रमिला चव्हाण, स्मिता शिंदे, कोमल सुतार, धनश्री पाटील, सोनाली माने ,वैशाली पवार, जालींदर शेटे, सुनिता पवार यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालय कराड येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याबरोबरच मलकापूर येथील कृष्णा व अपर्णा नर्सिंग स्कुलचे प्रशिक्षणार्थी, शिक्षक तसेच विजयनगर येथील माऊली नर्सिंग स्कुल आणि महिला महाविद्यालय कराड, येथील शिक्षक व विद्यार्थी, विहान प्रकल्प, संग्राम संस्था, वाहतुक पोलीस यांचे प्रतिनिधी सहभागी होते. सूत्रसंचलन व प्रस्तावना महेश शिंदे यांनी केले. महेश उणउणे यांनी आभार मानले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |