सातारा : तडीपार केलेल्या गुंडाला स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) ताब्यात घेतले. संशयिताकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. अविनाश विलास दडस (वय 24, रा.आरफळ फाटा ता.सातारा) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा एलसीबीचे पथक गस्त घालत असताना त्यांना संशयित अविनाश दडस निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताच तो पळून जावू लागला. पोलिसांनी त्याला थरारक पाठलग करुन पकडले. संशयिताकडे अधिक चौकशी करत असताना तो दोन वर्षे तडीपार असल्याची माहिती समोर आली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्याच्या आणखी चौकशी करताच 20 दिवसांपूर्वी त्याने दुचाकी चोरी केली असल्याची माहिती दिली. ही माहिती ऐकूण पोलिसही अवाक झाले.
एलसीबी पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून तालुका पोलिसांकडे तडीपार व दुचाकी चोरीबाबत खात्री केली. खात्री पटल्यानंतर त्याला तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. एलसीबी पोलिसांनी संशयिताकडून चोरीची दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोनि सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंग साबळे, सपोनि डॉ.सागर, पोलिस हवालदार नागे, बर्गे, नाचन, जाधव, कडव, पोळ, कापरे, महाडीक, शिंदे, सावंत यांनी कारवाईत सहभाग घेतला.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |