कराड : वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टरांना आपआपल्या हॉस्पिटलमध्ये दरपत्रक लावणे सक्तीचे करावे. गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला वैद्यकीय उपचार परवडतील यासाठी डॉक्टरांनी सहकार्य करावे. जे डॉक्टर चुकीच्या पध्दतीने व्यवसाय करतील त्यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आंदोलन उभे करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष अॅड.विकास पवार व तालुका अध्यक्ष दादासो शिंगण यांनी दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज (सोमवारी) बोलत होते. यावेळी उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, कराड शहराध्यक्ष सागर बर्गे, महिला जिल्हाध्यक्षा मिनाक्षी पोळ आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, काही डॉक्टर प्रामाणिकपणे वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. मात्र काही डॉक्टर मनमानी कारभार करून लोकांच्याकडून अमाप पैसा उकळत आहेत. काही हॉस्पिटल सोडली तर कराडातील अनेक हॉस्पिटलमध्ये उपचाराचे दरपत्रक लावले नाहीत. केसपेपर बाबतही सर्वसामान्यांना परवडतील असे केसपेपरची फी आकारली जावी. काही हॉस्पिटलमध्ये 200 रूपयांपासून 500 रूपयांपर्यत केसपेपर फी आकारली जाती त्याबाबतही योग्यती कारवाई व्हावी. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी स्वतःचे मेडीकल काढले आहे. अशी मेडीकले नियमांचे उल्लंघन करीत आहेत. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे इतर कोणत्याही मेडिकलमध्ये मिळत नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव रूग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमधीलच भरमसाठ किंमतीची औषधे घ्यावी लागत आहेत. काही डॉक्टर निव्वळ मेडिकलमध्ये टक्केवारीच्या फायद्यामध्ये वाढ व्हावी म्हणून विनाकारण महागडी औषधे लिहून देत आहेत. याबाबत योग्य ती चौकशी होऊन कारवाई व्हावी.
औषधांवर उत्पादन खर्चापेक्षा 20 ते 25 टक्के नफा ठेऊन औषध कंपन्यांनी एमआरपी ठेवावी. अनेक खाजगी हॉस्पिटलमध्ये पैसे कमवण्यासाठी गरोदर महिलांचे सिझर केले जातात. वास्तवीक ज्या हॉस्पिटलमध्ये 30 टक्क्यांपेक्षा ज्यादा सिझर केले जातात. त्या हॉस्पिटलांचे परवाने रद्द करण्याचा नियम आहे. परंतु अशा हॉस्पिटलवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. रूग्णालयात उपचारासाठी अॅडमिट असलेल्या पेशंटला रूमभाडे, नर्सिंग चॅर्जेस, इंजेक्शन देणे, सलाईन देणे, डॉक्टरांची व्हिजीट फी यासाठी सर्व हॉस्पिटलमध्ये एकच दर असावेत व त्याचे दरपत्रक लावले जावेत. सोनोग्राफीसाठीही माफक फि असावी यासाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र दरपत्रक लावणे गरजेचे आहे. यामध्ये कोणतेही छुपे खर्च नसावेत. सध्या प्रमाणापेक्षा जादा पैसे सोनोग्राफीसाठी आकारले जातात याबाबत योग्यती कारवाई व्हावी.
महात्मा फुले योजनेमध्ये बसणार्या आजारांचे फलक प्रत्येक हॉस्पिटलमध्ये लावणे सक्तीचे करावे. रक्त लघवी तपासणीसाठी पॅथॉलॉजी लॅबमध्ये एमडी पॅथॉलॉजीस्टीक असणे गरजेचे आहे. व प्रत्येक रिपोर्टवर त्यांची सही असणे बंधनकारक असतानाही अनेक लॅबमध्ये ते केले जात नाही. खाजगी रूग्णालयाप्रमाणे सरकारी रूग्णालयानेही सर्व सेवा सुविधा व स्वच्छतेबाबत योग्य ती उपाययोजना करावी. कराड शहरातील वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टरांच्या मनमानी कारभाराविरोधात मनसेने 18 मार्च रोजी कराडात मुक मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मोर्चा रद्द करण्यात आला आहे. वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टरांनी आपल्या कामात व दरपत्रकात सुधारणा न केल्यास मनसे अशा हॉस्पिटल व डॉक्टरांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत जनआंदोलन उभे करील असा इशारा दिला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |