सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या लॉक डाऊनमुळे सर्वच व्यवहार, दुकाने तसेच हॉटेल्स बंद असल्यामुळे शहरातील ठिकठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी वास्तव्यास असलेल्या भटक्यांना या लॉक डाऊनचा फटका बसला असून गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्या अनुषंगाने शहरातील दानशुरांनी या भटक्यांच्या अन्नपाण्याची सोय करावी, अशी मागणी होवू लागली आहे.
कोरोना (कोविड-19) या विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगभरात आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशातील जनतेला स्टे ऍट होम म्हणत पूर्ण देशभरात लॉक डाऊन जाहीर केला आहे. या लॉक डाऊनमुळे अत्यावश्यक सेवा सोडल्यास सगळीकडे शटर डाऊन आहे. जिल्हाभरात शेकडोंच्या संख्येने भटके व बेघर लोक राहत आहेत. बसस्थानके, बाजार समित्या तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी या भटक्यांचे वास्तव्य आहे. सामान्य लोकांनी लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर किराणा माल तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा करुन स्वत:सह कुटूंबाचेच घरात विलगीकरण करुन घेतल्यामुळे अनेक नागरिकांचा बाह्य जगताशी संपर्क तुटला. मात्र, ज्याला निवाराच नाही, ज्याचे घरच उघडे सताड आकाश आहे, अशांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. चिमुरड्यांपासून वृद्धांपर्यंत अनेक भटके अन्नाच्या शोधात दाहीदिशा भटकत आहेत, परंतू पोटाला एकवेळचेही मिळेल अशीही शक्यता धूसर वाटत आहे.
पूर्वी या भटक्यांना हॉटेल्स, चायनीजचे गाडे, फळविक्रेते तसेच इतर दानशुरांकडून अन्न व तत्सम जिवनावश्यक वस्तू मिळत होत्या. परंतू गेल्या चार दिवसांत लॉक डाऊनमुळे लोकच रस्त्यावर येत नसल्याने आता भटक्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दानशुरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेवून अशा भटक्यांना आपापल्यापरिने मदत करावी, अशी मागणी होत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |