12:38am | May 06, 2019 |
कराड : घराचे खोदकाम करताना सापडलेले अर्धा किलो सोने 5 लाख रूपयास देतो, असे सांगून बांधकाम व्यावसायिकाकडून 5 लाख रूपये घेऊन सोन्याऐवजी पितळेचे दागिने देऊन कर्नाटकातील चौघांनी फसवणूक केल्याची फिर्याद संजय विजय सणस (रा. मरळी, ता. पाटण) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून चौघांवर गुन्हा नोंद झाला असून एकास अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. प्रवीण ब्रम्हानंद वेणेकर (वय 28, रा. गणेशनगर ता. मुडगोड, जि. कारवार, कर्नाटक), असे त्याचे नाव आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील मंजुनाथ बंजत्री (रा. गणेशनगर मुडगोड जि. कारवार) व अन्य दोघेजण (नावे समजू शकली नाहीत), असे तिघे फरारी आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी संजय सणस हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संशयीत मंजुनाथ बंजत्री हा पूर्वी त्यांच्याकडे गवंडी म्हणून कामास होता. गंवडी बंजत्री याने संजय सणस यांना फोन करून घऱाचे खोदकाम करत असताना अर्धा किलो सोने सापडले आहे. ते मला विकायचे आहे, असे सांगितले. त्यावेळी सणस यांनी मला काही नको, असे सांगितले. त्यावर बजंत्री याने वारंवार फोन करून 5 लाख रूपयांची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादी सणस यांनी मंजुनाथ बजंत्री याला सोने घेऊन कराडला येण्यास सांगितले. बुधवारी (दि. 1) दुपारी 12 वाजता पैसे तयार असल्याचे सणस यांनी फोनवरून सांगितल्यानंतर संशयित बजंत्री याने सणस यांना नांदलापूर गावच्या हद्दीत पाचवडा फाटा येथे येण्यास सांगितले. तेव्हा मरळी येथून संजय सणस 5 लाख रूपये घेवून मोटरसायकलवरून पाचवड फाटा येथे दुपारी दीडच्या सुमारास पोहोचले. मंजुनाथ बजंत्री व अन्य तिघेजण ओमनी गाडी (क्र. के. ए. 31 एम. 8470) घेऊन उभे होते. सणस यांनी मंजुनाथला सोन्याबाबत विचारले असता त्याने रूमालातील बारीक पिवळ्या धातूचे मनी दाखविले. त्यानंतर सणस यांनी मोटरसायकलच्या हँडलला अडकविलेली 5 लाख रूपये असलेली पैशाची बॅग काढून मंजुनाथला दिली. रूमालात बांधलेले सोने व्यवस्थित पाहिले ते पितळेचे असल्याचे जाणवले. तोपर्यंत मजुनाथ बजंत्री आणि अन्य तिघे ओमनी गाडीतून कोल्हापूर बाजूकडे पळून गेले. सणस यांनी त्यांचा पाठलाग करायला सुरूवात केल्यानंतर संशयितांनी मालखेड (ता. कराड) येथे ओमनी गाडी सोडून शेतात पळाले. सणस व काही लोकांनी पाठलाग करून चौघांपैकी प्रवीण वेणेकर यास काही अंतरावर पकडले. मंजुनाथ बजंत्री व अन्य दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले.
याप्रकरणी संजय सणस यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पकडलेल्या प्रवीण वेणेकर यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली. हवालदार सुनिल पन्हाळे तपास करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |