01:02am | Apr 01, 2019 |
सातारा : स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि लष्करी जवान यांच्या अनमोल त्यागातूनच देशाची जडणघडण झाली आहे. मात्र सध्याच्या सरकारने चुकीची धोरणे राबवल्याने देशाची अधोगती होऊ लागली आहे. विकेंद्रित झालेल्या सत्तेचे पुन्हा केंद्रीकरण होत असल्याने हे जुलमी सरकार उलथवून टाकण्याची वेळ येऊन ठेपली आहे, मतदार हाच लोकशाहीतील खरा राजा असून जनतेने अविचाराने न वागता मतदानाचा पवित्र अधिकार वापरून मुजोर राज्यकर्त्यांना धडा शिकवावावा, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
नांदगाव ता. कराड येथील श्रीराम मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बूथ कमिटी सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान सेलचे सारंग पाटील, माजी जि. प. सदस्य ऍड राजाभाऊ पाटील, ओबीसी सेलचे भानुदास माळी, कराड जनता बँकेचे राजेश पाटील वाठारकर, राष्ट्रवादी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे , नगरसेवक राजेंद्र यादव, सौरभ पाटील, डॉ. अजित देसाई, पांडुरंग पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सध्याच्या सरकारने चुकीची धोरणे राबवल्याने जनतेसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.विकास घडविण्यासाठी आवश्यक धोरणे आखण्याऐवजी मनमानी कारभार करणाऱ्या सरकारमुळे भारताची अवस्था सोमालियासारखीं होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीतीही यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, भानुदास माळी आदींचीही यावेळी भाषणे झाली. सारंग पाटील यांनी बूथ कमिटी सदस्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती दिली. ऍड राजाभाऊ पाटील यांनी प्रास्ताविक केले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |