02:29pm | Jul 11, 2019 |
कराड : श्री.मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथील विद्यालयातील इ.10वी परीक्षेतील प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी व एन.एम.एम.एस. व स्कॉलरशीप परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संतोष टकले यांनी हे मत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे राष्ट्रपतीपुरस्कार प्राप्त विद्या कँडमी विद्यानगरचे संचालक जीवन पवार, आनंदा थोरात, संस्थेच्या मार्गदर्शक डॉ.सौ.स्वाती थोरात, संस्थेचे संचालक वसंतराव चव्हाण उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहूणे जीवन पवार म्हणाले, अभ्यासाबरोबर खेळ व इतर स्पर्धेतून नाव कमावता येते.मनोरंजनापेक्षा ज्ञानप्राप्तीकडे लक्ष द्या.यावेळी त्यांनी शालेय जीवनातील अनुभव कथन केले.आयुष्य सुंदर कसे होईल याकडे लक्ष द्या,असे मत व्यक्त केले.आजपर्यत त्यांच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातून1500पेक्षा जास्त मुली अधिकारीपदावर कार्यरत आहेत.
प्रास्ताविकपर भाषणात मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांनी विद्यालयात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन विद्यार्थिनींनी यांतून प्रेरणा घेऊन यशाची चढती परंपरा कायम ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला.
सदर कार्यक्रमावेळी संस्थेचे संचालक वसंतराव चव्हाण,माजी मुख्याध्यापक मा.भास्करराव मोहिते,सौ.बागवान मँडम यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी समाजातील दातृत्व असणारे.लक्षमीनारायण सरलाया, निजामुद्दीन मोमीन, सौ.बागवान मँडम, सौ.सुशिला मोहिते, विकास नलवडे इ.मान्यवर तसेच सौ.शालिनीताई थोरात, सुधाकर शिंदे, हणमंत आणेकर, अनिल शिर्के, मारूती फराळे, कन्याशाळेचे पर्यवेक्षक सुरेश राजे, माता पालक, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सत्कारमूर्तींना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी संस्थेचे सचिव मळाईकुटुंबप्रमुख शेतीमित्र अशोकराव थोरात,संस्थेचे अध्यक्ष पी.जी.पाटील, उपाध्यक्ष भास्करराव पाटील, संस्थेचे खजिनदार तुळशीराम शिर्के यांनी शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांचेआभार संस्थेच्या मार्गदर्शक डॉ.सौ.स्वाती थोरात यांनी मानले.सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख सौ.जयश्री पाटील यांनी केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |